• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सरकारचे Meta ला अल्गोरिदम बदलण्याचे आदेश; AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी

सरकारचे Meta ला अल्गोरिदम बदलण्याचे आदेश; AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी

केंद्र सरकारने इंस्टाग्राम आणि फेसबुकला अल्गोरिदम बदलण्याचे आदेश दिले आहेत. वारंवरा एकाच प्रकारचा कंटेट युजर्सना दिसू नये यासाठी कठोर पावले उचलण्यादे निर्देश दिले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 19, 2026, 07:43 PM IST|Updated: Oct 19, 2026, 07:44 PM IST
joinshare
सरकारचे  Meta ला अल्गोरिदम बदलण्याचे आदेश; AI व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Meta : आजकल सर्वचजण सोशल मिडियावर सक्रिय आहेत.  फेसबुक आणि इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना एखादा व्हिडिओ पाहिल्यावर त्याच प्रकारचे व्हिडिओ फीडमध्ये येत राहतात. AI आणि सोशल मीडियाच्या या युगात, सरकारने आता या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. फेसबुक तसेच इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाला केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) कडक सूचना जारी केली आहे.  मेटाने आपल्या शिफारस प्रणालीमध्ये अर्थात  (recommendation system) सुधारणा करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोशल मिडियावर निवडक आणि एकतर्फी बातम्या दाखवल्या जाऊ नयेत असा सरकारचा उद्देश आहे.

सध्या सर्वचजण सोशल मीडियावर रील्स, पोस्ट्स किंवा बातम्या पाहत असतात. अल्गोरिदममुळे एखादा व्हिडिओ किंवा पोस्ट पाहिल्यावर तशांच प्रकारचा कंटेट पहायला मिळतो.  केंद्र सरकारने 'मेटा'ला  अल्गोरिदम बदलण्याचे आदेश दिले आहेत. युजर्सना वारंवार एकाच प्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट दिसतील  अशा प्रकारे  अल्गोरिदम नसावेत. अशा प्रकारच्या  अल्गोरिदममुळे एकाच प्रकारचा कंटेट दिसत राहतो. यामुळे समाजात एकतर्फी विचार खूप वेगाने पसरतो. यामुळे कधीकधी वातावरण बिघडू शकते. सरकारने कंपनीला अशा सर्व पोस्ट्स आणि व्हिडिओंवर बारकाईने लक्ष ठेवण्यचे निर्देेश दिले आहेत.

सरकारने मेटा कंपनीला  अल्गोरिदम बदलण्याचे  आदेश का दिले? 

वारंवार एकाच प्रकारचा कंटेट फिडमध्ये आल्याने याचा परिणाम युजर्सच्या मानसिकतेवर होऊ शकततो.  जे देशातील शांतता भंग करू शकतात, हिंसाचाराला चिथावणी देऊ शकतात किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देऊ शकतात. यामुळे सरकारने मेटा कंपनीला  अल्गोरिदम बदलण्याचे  आदेश दिले आहेत.

AI जनरेटेड व्हिडिओवर कारवाई करण्याचे आदेश

सरकारने असंबद्ध आणि जुन्या व्हिडिओंवर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  सरकारने नवीन मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.  जेव्हा एखादा जुना व्हिडिओ, जुने फोटो किंवा दुसऱ्या शहरातील घटना अलीकडील घटना म्हणून शेअर केली जाते, तेव्हा सोशल मिडियावर अशा प्रकारचा कंटेट प्रचंड व्हायरल होतो.  

अनेकदा व्हिडिओमध्ये योग्य माहिती किंवा संदर्भ नसतो, ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. असे व्हिडिओ कोणत्याही संदर्भाशिवाय व्हायरल होऊ नयेत. जर एखाद्या व्हिडिओमध्ये पोलीस कारवाई, आणीबाणी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती असेल, तर त्यासोबत अचूक आणि संपूर्ण माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून जनतेमध्ये गैरसमज पसरणार नाही असं मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मेटाला उपस्थित केलेले मुद्दे

मेटासाठी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत नियावली जाहीर केली आहे. आयटी नियमांचे उल्लंघन करणारा कंटेट शेअर झाला असल्यास मेटा कंपनीने तात्काळ यावर कारवाई करावी. शिफारस आणि क्रमवारी प्रणालीचा सखोल आढावा घ्यावा, जेणेकरून वापरकर्त्यांच्या फीडमध्ये कोणताही दिशाभूल करणारा किंवा विकृत व्हिडिओ वारंवार दिसणार नाही. कंपनीच्या अल्गोरिदममध्ये विविधता असावी. यामुळे युजर्सना एकाच प्रकारच्या कंटेट ऐवजी  वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट पहायला मिळेल. 

आयटी नियम आणि कायद्यांचा संदर्भ द्यावा लागेल. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि आयटी नियम 2021 नुसार मेटा केवळ एक मध्यस्थ आहे. या नियमांनुसार, कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अशी कोणतीही माहिती प्रसारित करू नये, जी सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करु शकते अथवा  कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देणारी ठरु शकते. इंटरनेटवरील माहिती लोकांपर्यंत अचूकपणे आणि जबाबदारीने पोहोचावी हे सुनिश्चित करण्यासाठी आहे. मेटाला याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकचं नाही तर सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी कशा प्रकरे केली जणार आहे. याची  संपूर्ण माहिती मंत्रालयाला देण्यासही सांगण्यात आले आहे.

सरकराच्या निर्णयाला विरोध

डिजिटल हक्क आणि गोपनीयतेवर काम करणाऱ्या संघटनांनी सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. जरी ही सूचना पूर्णपणे कायदेशीररित्या बंधनकारक नसली तरी, सेन्सॉरशिपप्रमाणे सतत दबाव निर्माण करण्याचे काम करणारी आहे. अशा सूचनांमध्ये 'योग्य संदर्भाशिवाय' आणि 'संवेदनशील वातावरण' यांसारखे शब्द वापरले जातात.  सरकारने अशी सूचना मागे घ्यावी आणि मेटाने हे देखील स्पष्ट करावे की ते कोणाच्या आदेशानुसार कोणती पोस्ट काढून टाकत आहेत किंवा तिची पोहोच कमी करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india