• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले की, 'हा मुलांचा..'

मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले की, 'हा मुलांचा..'

लहान मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 17, 2026, 06:10 PM IST|Updated: Oct 17, 2026, 06:19 PM IST
joinshare
मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर बंदी घालण्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले की, 'हा मुलांचा..'
Image Credit: Internet Ban

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लहान मुलांच्या इंटरनेट वापराबाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, मुलांसह सर्वांसाठी इंटरनेटचा वापर हा एक मूलभूत अधिकार आहे.  न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सुचवलं आहे की, मुलांच्या इंटरनेट वापरावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाही. यावर निर्बंध घालण्यापेक्षा  त्यांची ऑनलाइन सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया खात्यांसाठी 'चाइल्ड मोड' लागू करण्यासारख्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत.

हा महत्त्वपूर्ण निकाल देताना सु्प्रीम कोर्टाने म्हटलं की, इतर लोकांप्रमाणेच मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार आहे. तसंच संविधानाच्या अनुच्छेद 21 आणि अनुच्छेद 19(1)(अ) नुसार मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार आहे. मुलांना इंटरनेट वापरण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवणे हे चुकीचे आहे.

सु्प्रीम कोर्ट म्हणाले की, ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मुलांना इंटरनेटपासून पूर्णपणे दूर ठेवणे हा योग्य उपाय नाही. तर या उलट इंटरनेट बंदीमुळे मुले असुरक्षित आणि अनियंत्रित माध्यमांकडे त्यांच्या कल वाढू शकतो. तर सुप्रीम कोर्टाने काही उपाययोजना सुचवत म्हटलं आहे की, सोशल मीडिया माध्यमांवरील बाल लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह मजकूर नियंत्रित करण्यासाठी उपाय करावे लागणार आहे.  

कोर्टाने मुलांसाठी पालकांची संमती आणि मार्गदर्शन यांसारख्या सुरक्षा उपायांची शिफारस केल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. शिवाय मुलांची खाती खाजगी ठेवणे आणि अनोळखी प्रौढांकडून येणाऱ्या मेसेजवर मर्यादा घालणे यांसारख्या उपाययोजनाही कोर्टाने सुचवल्या आहेत. आज इंटरनेट हे शिक्षण, माहिती मिळवणं आणि इतरांशी संपर्क साधणं सर्वात मोठे आणि महत्त्वाचे माध्यम आहे. तसंच मुलांच्या वयानुसार सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातल्यास त्याचा खरोखर फायदा होईल का,असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला आहे.

सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केलं की, इंटरनेटवर पूर्णपणे बंदी घालण्यास विरोध करणे म्हणजे वयानुसार सुरक्षा उपाय करण्यासही विरोध आहे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Supreme court
Breaking News