SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जगातील सर्वात मोठी चीप कंपनी भारतातील 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार; कंपनीचे नाव जाणून शॉक व्हाल

जगातील सर्वात मोठी चीप कंपनी भारतातील 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे. 26 लाख पगाराची नोकरी एका झटक्यात कशी गेली याचा अनुभव एका IT इंजिनीयरने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 11, 2026, 22:20 IST | Updated: Nov 11, 2026, 22:28 IST
Join

Qualcomm Layoffs : अमेरिकन चिप कंपनी क्वालकॉमने मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याचा मोठा फटका भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. भारतातील 1000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. कर्मचारी कपातीचा पहिला टप्पा या आठवड्यात पार पडू शकतो.  बंगळूरु येथील कार्यालयातील कर्मचारी आपली नोकरी गवामू शकतात.   येत्या काळात भारतात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकते.

भारतात क्वालकॉमचा मोठा व्यवसाय आहे.  क्वालकॉमचे भारतात अंदाजे 20,000 कर्मचारी  कार्यरत आहेत.  क्वालकॉममध्ये जगभरात अंदाजे 52,000 कर्मचारी नोकरी करतात. अहवालानुसार, कंपनी जागतिक कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे  7 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. अंदाजे 3,600 कर्मचारी आपली नोकरी गमावू शकतात. क्वालकॉमचे भारतात अंदाजे 20,000 कर्मचारी असून,  बंगळूर, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि चेन्नई येथील कार्यालयांमध्ये हे कर्मचारी काम करतात. 

अहवालानुसार, या पुनर्रचनेमुळे भारतातील सुमारे 1,000 नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. जानेवारी 2027 मध्ये कर्मचारी कपातीची दुसरी फेरी अपेक्षित आहे. फ्रेशर्स तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. चीपची डिमांड कमी झाल्याने कंपनी इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत आहे. नव्या व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत असल्याचे सांगितले जात आहे. 

काही क्वालकॉम कर्मचाऱ्यांनी कर्मचारी कपातीनंतर सोशल मिडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. विकास ऑलवेज नावाच्या एका युजरने  26 लाख पगाराची नोकरी एका झटक्यात कशी गमावली याचा अनुभव सांगितला आहे.  त्याला क्वालकॉममध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळाली. मात्र, लेऑफचा फटका बसला आणि 26 लाख पगाराची नोकरी एका झटक्यात हातातून गेली. 
नोकरीवरुन काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंदाजे तीन महिन्यांच्या पगाराएवढे सेवा समाप्ती पॅकेज मिळू शकते. याव्यतिरिक्त, काही कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत कार्यमुक्तीची कागदपत्रे सादर केल्यास, त्यांना अतिरिक्त एका महिन्याच्या पगाराची ऑफर देण्यात आल्याचेही वृत्त आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES