SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'सत्ता घेऊन मरायचंय एवढंच...', विजय वडेट्टीवारांच्या संतापाचा कडेलोट; 'सुप्रिया सुळेंना सत्तेत...'

शरद पवारांच्या पक्षाने डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 11:21 IST | Updated: Nov 28, 2026, 11:22 IST
Image Credit: congress leader vijay wadettiwar attack on sharad pawar and supriya sule over supporting delimitation bill
Join

'सुप्रियाताईंना सत्तेत जायचंय, हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे,' अशी जहाल टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या निर्णयावरुन काँग्रेसने संताप व्यक्त करत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत या विषयावर भाष्य केलं आहे.

'मी सुप्रिया ताईंचा प्रवास पाहिला आहे. ते वारंवार बोललात की काँग्रेसवाले का चिडतात. आम्ही काहीच चिडणार नाहीत. भाजपच्या विमानात फिरले तरी आम्ही चिडणार नाही. पंतप्रधानांना चार-पाच वेळा भेटले तरी आम्ही चिडणार नाहीत. आम्हाला आनंद आहे. कुठेही जातील भाजपसोबत बसतील, चर्चा करतील, आम्हाला तर आनंद आहे. मला त्यावेळसच कळलं होतं. सुप्रिया सुळेंना सत्तेत जायचंय, मंत्री व्हायचं असेल, काय व्हायचं असेल. त्यामुळं यांना विचारच नाही.  हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे. दोघेही बापलेक निर्णय़ घेतात, भाजपला साथ देण्याचा निर्णय घरात मिळून घेतला आहे, 'अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

'लोकशाही संपवण्यासाठी उचललेलं पाऊल असून अत्यंत घातक आणि दुर्दैवी असा निर्णय आहे. पवार साहेबांनी आयुष्यभर जो विचारांना घेऊन जगले. तोच विचार त्यांच्या उत्तरार्धातमध्ये पायदळी तुडवण्याचं काम करताहेत. याचा अर्थ उद्याच्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाईल. कारण या देशात 2029 नंतर निवडणुका होतीलच का? अशी परिस्थिती उद्भवली जाईल. हे डिलिमीटेशन मतदार संघाच्या पुनर्रचनेचा नाही तर हे लोकशाहीची हत्या कऱणारे विधेयक आहे. या विधेयकाला जो पाठिंबा देईल त्याचे नाव देशाच्या गद्दारीच्या यादीत येईल, असं माझं मत आहे,' असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.  

'लोकसभेत शरद पवार आमच्यासोबत नसते तर दोन खासदार पण निवडून आले नसते. राहुल गांधींनी यात्रा काढली. भारत जोडोच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि या लोकांचा (भाजप)  405 चा नारा होता. तो केवळ संविधान बदलवण्यावासाठी आणि मनुस्मृतीवर देश चालवायचा ही त्याची भूमिका होती.  पवार आमच्या सोबत आले म्हणून त्यांचे खासदार निवडून आले,' असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

'पक्ष फुटल्यानंतर व फुटायच्या अगोदर पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होती. आम्ही भाजपसोबत जाणार नाही. पण आता आम्हाला इतिहास आठवतो. पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसायचा आहे. आणि पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केलं आहे. जो बिलाला पाठिंबा देईल तो आमच्याबरोबर नसणार. हे बिलच देशविघातक आहे,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पवारांवर जहरी टीका केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES