SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

25 वर्षीय विवाहितचे धक्कादायक कृत्य, 2 बॉयफ्रेंडला घरी बोलवलं अन् मग...घटनेमुळे एकच खळबळ

25 वर्षीय विवाहित महिलेने अनैतिक संबंधातून धक्कादायक कृत्यामुळे तिला गुन्हेगारी जगात घेऊन गेलं आहे. 2 बॉयफ्रेंडच्या मदतीने जे कृत्य केलं ते अतिशय भयानक होतं.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 09:40 AM IST | Updated: Nov 02, 2026, 09:43 AM IST
Image Credit: Crime News Telangana
Join

एका विवाहित महिलेने तिच्या दोन प्रियकरांच्या मदतीने खूनी खेळ खेळला आहे. 25 वर्षीय या विवाहित महिलेने दोन बायफ्रेंडच्या मदतीने पतीचा हत्या केली आहे. तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. या महिले आपल्या दोन्ही बॉयफ्रेंडला घरी बोलवलं आणि त्यानंतर नवऱ्याची हत्या केली. या तिघांनी त्याला दारूचं आमिष दाखवून घराबाहेर बोलवालं. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे मृतदेह एका तलावात फेकला.

संशयास्पद मृत्यूची नोंद पण...

त्यानंतर 23 ऑक्टोबर 2O26 रात्री गावाबाहेर पचेरा चेरुवू तलावात अनोळखी व्यक्ता मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास केल्या समोर आलं की त्याचे नाव गुम्मडी काशीराम आहे. तर तो 26 वर्षांचा होता. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. काशीरामचे वडील चकली भूमैया यांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काशीरामचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या झाल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्ह्याची नोंद करून मारेकऱ्यांचा शोध सुरु झाला.

हेसुद्धा वाचा -  आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग

असा उघड झाली घटना

पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, काशीरामची पत्नी गुम्मडी सविता हेचं त्याच गावातील चिंताकिंदी रामू आणि पसुपुला संतोष या दोन तरुणांसोबत विवाहबाह्य संबंध होते. सविताला पतीपासून सुटका हवी होती म्हणून तिने दोन बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. त्यांनी काशीरामचा मृतदेह तलावात फेकला ज्यामुळे हा एक अपघात वाटेल. पण पोलिसांनी त्यांच्या हा कथित कट उघडकीस आणला.

हेसुद्धा वाचा - गुप्तांगाच्या भागात 3 जखमा, अंतर्वस्त्र काढले अन्..., ठाणे पोलिसांवर आरोप करणाऱ्या तरुणाचा धक्कादायक VIDEO समोर

पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. तर पोलिसांनी या तिघांना  कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES