• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /चेंजिंग रूममध्ये 18 वर्षीय तरुणी गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, नेमकं काय घडलं? एकतर्फी प्रेमातून...

चेंजिंग रूममध्ये 18 वर्षीय तरुणी गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, नेमकं काय घडलं? एकतर्फी प्रेमातून...

मोतीनगर परिसरातील एका दुकानातील चेंजिंग रूममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 12:12 PM IST|Updated: Nov 15, 2026, 12:16 PM IST
joinshare
चेंजिंग रूममध्ये 18 वर्षीय तरुणी गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, नेमकं काय घडलं? एकतर्फी प्रेमातून...
Image Credit: dehil Crime News

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिल्लीमधील मोती नगर परिसरातील एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. दुकानातील चेंजिंग रूममध्ये 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, ज्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार मोती नगरच्या ब्लॉकमधील 5/8 मधील दुकानात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी याच दुकानात कामावर होती. या तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान मृत तरुणीच्या कुटुंबियांनी सूरज नावाच्या तरुणावर हत्येचा आरोप केला आहे. सूरज हा मृत तरुणीच्या बहिणीचा दीर आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, सूरजने यापूर्वीही तिला मारहाण केली होती.

त्याने या तरुणीची हत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण पोलिसांना संशय आहे की, ही हत्या एकतर्फी प्रेमातून किंवा कौटुंबिक वादातून झाली असावी. दरम्यान सूरज फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 14 नोव्हेंबरला संध्याकाळी घडली आहे. ज्या कपड्याच्या दुकानात तरुणी काम करत होती. त्याच दुकानाच्या ट्रायल रूममध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एवढी मोठी घटना दुकानात घडते इतरांना कोणालाही काहीच कळलं नाही, याबद्दल पोलिसांना संशय आला आहे. त्यासोबत दुकानातील सीसीटीव्ही आहे का, त्याचा तपास पोलीसही घेत आहे. दरम्यान तरुणीच्या हत्येमागील कारण आणि आरोप शोधण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पैलूचा तपास करत आहेत. 
 

मुंबईतील व्यावसायिकाला खंडणीची मागणी

मुंबईतील व्यावसायिकाकडे डी कंपनीच्या नावाने ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप समोर आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची व्यावसायिक मोहम्मद फारुख शेख यांची मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.  बांधकाम व्यावसायिक रिजवी यांची पत्नी रुबीना रिजवी आणि गुंड रियाज भाटीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकिलांची फी आणि रिजवी यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणातील NOC वरून वाद झाल्याचा तक्रारदाराचा दावा करण्यात आला आहे. २७ सप्टेंबरला रियाज भाटी याने स्वतःला D-कंपनीचा सदस्य सांगत ५ कोटींची खंडणी मागत धमकावल्याचा आरोप केला होता.  रियाज भाटी याआधीही अश्या अनेक प्रकरणात आरोपी असून सध्या तो जामिनावर आहे. व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये जाऊन कथितपणे धमकी देतानाचा रियाज भाटीचा व्हिडिओ समोर आला आहे. एनओसी न दिल्यास डी कंपनीमार्फत हत्या घडवून आणण्याची रुबीना यांनी धमकी दिल्याचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिट २ कडून रुबीना रिजवी यांना समन्स पाठवला असून १७ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Breaking News