SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹500 साठी शेजारणीला संपवलं, अंगावरील दागिन्यांबरोबरच तिचे सोन्याचे दात काढले अन्...; MP मधील गुन्ह्याचं महाराष्ट्र कनेक्शन, घटनाक्रम समोर

माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी संशयाच्या आधारे सुरु केलेल्या तपासामध्ये मोठं यश मिळालं आहे. नेमकं झालं काय? हे प्रकरण कुठलं ते पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 09:57 IST | Updated: Nov 10, 2026, 10:05 IST
Image Credit: आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश (फोटो स्क्रीनशॉटवरुन साभार)
Join

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील शाहजहानाबादमधील एका 60 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आळी आहे. अवघ्या 500 रुपयांवरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्यानंतर मृत महिलेचे दागिने शेजारच्या महिलेनेच पळवल्याचं समोर आलं आहे. वृद्ध महिलेची हत्या करण्यासाठी आरोपीने आधी तिचे तोंड आणि नाक दाबून धरले. श्वास न घेता आल्याने या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिन्यांबरोबरच सोन्याचे दातही काढून घेत घटनास्थळावरुन महिला आरोपी फरार झाली. पोलिसांनी फरार महिला आरोपीला अटक केल्यानंतर हत्येचं गूढ उलगडलं आहे.

शवविच्छेदन केलं अन् गुन्हा दाखल झाला

मृत महिलेचं नाव कलरी देवी असं आहे. कलरी या शाहजहानाबाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मल्टी ए-2, बाजपेयी नगर येथील रहिवासी होत्या. त्या पती हरिचंद्र प्रजापतींसोबत राहत होत्या. 6 नोव्हेंबर रोजी कलरी यांचा हमीदिया रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांना हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची शंका आल्याने शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्याने आणि श्वास कोंडल्याने कलरी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्या आणि दरोड्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

तपासात धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी तपास सुरु केला असता घटनेच्या दिवशी आरोपी रेखा उर्फ ​​रीटा ही मयत महिलेच्या घरी आल्याची माहिती मिळाली. रेखा 500 रुपये मागण्यासाठी या वृद्ध महिलेच्या घरी आली होती. कलरी यांनी रेखाला 500 रुपये देण्यास नकार दिला. रेखा जेव्हा कलरी यांच्या घरी आली तेव्हा ती नशेत होती. त्यामुळेच पैसे न मिळाल्याने आणि दागिन्यांच्या लोभापायी, रेखाने कलरीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ती तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि मयत महिलेचे सोन्याचे दात घेऊन पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी स्थापन केली एसआयटी

वयस्कर महिलेची अशाप्रकारे गजबजलेल्या ठिकाणी हत्या झाल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले. आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाजवळ राहणाऱ्या लोकांची चौकशी केली आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान, मृत महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेची म्हणजेच रेखाची भूमिका संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी महिला मूळची महाराष्ट्रातील

अटक करण्यात आलेली आरोपी रेखा ही 45 वर्षांची असून ती मूळची महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवासी आहे. रेखा सध्या भोपाळमधील ईदगाह हिल्स येथील ए-1/जी-7 मल्टी बाजपेयी नगर येथे वास्तव्यास होती. रेखाचे पती सुरेश सुडारकर यांचं यापूर्वीच निधन झालं आहे. पोलिसांनी रेखाकडून मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जप्त केले. यामध्ये कानातले, नथ, सोन्याचे दात, पैंजण आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. गुन्ह्याच्या वेळी रेखाने परिधान केलेले कपडे, चप्पल आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध यापूर्वी दाखल आहेत गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा ही हिस्ट्री शिटर आहे. म्हणजेच तिच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. रेखाविरुद्ध निशातपुरा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच शहाजहानाबाद पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही रेखाविरुद्ध दाखल आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES