• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठं संकट? संशोधकाचा गंभीर इशारा; कारण खूपच धक्कादायक!

2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठं संकट? संशोधकाचा गंभीर इशारा; कारण खूपच धक्कादायक!

AI संशोधक निकोला जुर्कोविक यांनी 2027 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2030 पर्यंत मानवतेला असलेल्या धोक्याबाबत त्यांनी काय इशारा दिला?

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 28, 2026, 16:27 IST|Updated: Nov 28, 2026, 16:39 IST
joinshare
2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठं संकट? संशोधकाचा गंभीर इशारा; कारण खूपच धक्कादायक!
Image Credit: एआय महासंकट

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या संभाव्य धोक्यांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. एआयमुळे नोकऱ्या जाण्यापासून ते सायबर हल्ले आणि मानवी नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अशातच एआय सुरक्षा संशोधक निकोला जुर्कोविक यांनी 2027 मध्ये कोविड महामारीपेक्षाही मोठे संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला आहे. काय घडलंय नेमकं? याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? सविस्तर जाणून घेऊया.

2027 मध्ये कोविडपेक्षाही मोठे संकट?

जुर्कोविक यांनी 26 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या कुटुंबीयांसाठी खुले पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी एआयच्या वेगवान विकासाबाबत चिंता व्यक्त केली. पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये एआयमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी मांडली. यामध्ये जीवितहानीचाही धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मानवतेला 2030 पर्यंत 50 टक्के धोका?

एआयच्या अत्याधुनिक प्रणालींना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची क्षमता मिळू शकते. अशा प्रणाली मानवी बुद्धिमत्तेलाही मागे टाकू शकतात, असे जुर्कोविक यांना वाटते. त्यांनी 2027 पर्यंत अशी क्षमता विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एआय विकासाचा वेग लक्षणीयरीत्या कमी केला नाही, तर 2030 च्या अखेरपर्यंत मानवतेचे अस्तित्व धोक्यात येण्याची किंवा मानवांचे नियंत्रणच संपुष्टात येण्याची शक्यता 50 टक्क्यांच्या आसपास असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

AI मुळे नेमके कोणते धोके संभवतात?

जुर्कोविक यांनी प्रामुख्याने तीन संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. पहिला म्हणजे AI प्रणाली नियंत्रणाबाहेर जाऊन वीजपुरवठा, दळणवळण किंवा इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये हस्तक्षेप करू शकतात. दुसरा धोका म्हणजे चुकीच्या प्रवृत्तीचे लोक AI चा वापर करून जैविक शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात. तिसरा धोका म्हणजे महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार माणसांकडून यंत्रणांकडे अधिक प्रमाणात सोपवले जाऊ शकतात. या शक्यता प्रत्यक्षात घडल्या आहेत, असा त्यांचा दावा नाही; त्या संभाव्य धोक्यांबाबत त्यांनी सावध केले आहे.

दहा वर्षांत अनेक नोकऱ्या संपण्याची भीती

AI मुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकतात, असे जुर्कोविक यांचे मत आहे. पुढील दशकात सध्याच्या अनेक नोकऱ्यांचे स्वरूप बदलू शकते किंवा त्या पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक नियोजनावरही पुढील एक ते पाच वर्षांत परिणाम होऊ शकतो. भारतातही आयटी, ग्राहक सेवा, कंटेंट निर्मिती आणि कार्यालयीन कामांमध्ये एआयचा वापर वाढत असल्याने या चर्चेला महत्त्व आहे.

जागतिक नियमांची मागणी

संभाव्य संकटाचा विचार करून कुटुंबीयांनी घरात किमान दोन आठवड्यांचा अन्न आणि पाण्याचा साठा ठेवावा, तसेच काही रोख रक्कम जवळ ठेवावी, असा सल्ला जुर्कोविक यांनी दिलाय. ऑनलाइन बँकिंग यंत्रणा विस्कळीत झाल्यास अडचण येऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर एआयच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर कठोर नियम तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
News in Marathi