SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'थंड डोक्याने काटा काढला..',लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार झाल्यानंतर CRPF महासंचालकांची पोस्ट चर्चेत

CRPF महासंचालकांची 'थंड डोक्याने हिशेब चुकता केला!' अशा आशयाची एक पोस्ट केली. कुलगाममध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट ठार झाल्यानंतर ही पोस्ट करण्यात आलीय. याबद्दल जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 18, 2026, 11:44 IST | Updated: Nov 18, 2026, 12:00 IST
Image Credit: सीआरपीएफ महासंचालकांची पोस्ट
Join

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा म्हणजेच LeT या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याला चकमकीत ठार केलं होतं. ११ नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. या कारवाईनंतर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडियावर केलेली एक सूचक पोस्ट चर्चेत आली आहे. सम डिशेस आर बेस्ट सर्व्ह कोल्ड, इव्हन कोल्ड वेदर असं त्यांनी म्हटलं. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई

18 नोव्हेंबर रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील झांगलपोरा परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली. जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परिसराला घेराव घालण्यात आला. या संयुक्त कारवाईत जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल सहभागी होते. या कारवाईदरम्यान लतीफ भट एका मशिदीत लपल्याची माहिती समोर आली होती. यानंतर सीआरप झालेल्या चकमकीत तो मारला गेला.

 

शरण येण्याचं आवाहन पण दहशतवाद्याचा नकार

कुलगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनायत अली यांनी यासंदर्भात अपडेट दिली. सुरक्षा दलांनी लतीफ भटला शरण येण्याची अनेकदा विनंती केली होती. त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारेही संवाद साधण्यात आला. त्याचं वय कमी असून पुढे संपूर्ण आयुष्य असल्याचं सांगत शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर मशिदीतून गोळीबार सुरू केल्याने चकमक तीव्र झाली. धार्मिक स्थळाचं कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी सुरक्षा दलांनी संयम बाळगल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सीआरपीएफ महासंचालकांची सूचक पोस्ट

लतीफ भट मारला गेल्यानंतर सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. कॉन्ग्रॅच्युलेशन गाईज, सम डिशेस आर बेस्ट सर्व्ह कोल्ड, इव्हन कोल्ड वेदर  असं त्यांनी लिहिलं. या पोस्टमधील 'काही गोष्टींचा हिशेब थंड डोक्यानेच चुकता केला जातो' या अर्थाच्या सूचक विधानाची चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईत सहभागी सुरक्षा दलांचं त्यांनी अभिनंदन केलं.

सीआरपीएफ हल्ल्याशी संबंध

11 नोव्हेंबर रोजी कुलगाममधील अखरान परिसरात सीआरपीएफच्या नाक्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले होते. लतीफ भट आणि त्याचा साथीदार उमर निसार दार यांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. हल्ल्यापूर्वी दोघांनी परिसरातील काही ठिकाणांची रेकी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

साथीदार उमर निसार दारही चकमकीत ठार

लतीफ भटचा शोध सुरू असताना 16 नोव्हेंबर रोजी कुलगाममधील लारू परिसरात सुरक्षा दलांची त्याच्याशी आणि साथीदार उमर निसार दार याच्याशी चकमक झाली होती. या कारवाईत उमर निसार दार मारला गेला; मात्र लतीफ भट पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम तीव्र केली. अखेर 18 नोव्हेंबरला लतीफ भटचा खात्मा करण्यात आला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES