• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग; DDA ची 2,516 घरांची जबरदस्त योजना; फ्लॅटची किंमत 14.95 लाख

2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग; DDA ची 2,516 घरांची जबरदस्त योजना; फ्लॅटची किंमत 14.95 लाख

DDA ने 2,516 घरांची जबरदस्त योजना आणली आहे. 2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग झाले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 21, 2026, 11:10 PM IST|Updated: Oct 21, 2026, 11:14 PM IST
joinshare
2 तासांत 2500 घरांचे रेकॉर्डब्रेक बुकिंग; DDA ची 2,516 घरांची जबरदस्त योजना; फ्लॅटची किंमत 14.95 लाख

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

DDA Housing Investment Scheme 2026  : दिल्लीत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, दिल्ली विकास प्राधिकरणाची (DDA) गृहनिर्माण योजना आणली आहे.  डीडीएच्या गृहनिर्माण गुंतवणूक योजना 2026 ला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दुपारी 12 वाजता ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच 2500 हून अधिक एलआयजी फ्लॅट्स बुक झाले. या योजने अंतर्गत नरेला येथे 14.95 लाख रुपयांपासून सुरू होणारे परवडणारे फ्लॅट्स उपलब्ध आहेत.

या योजनेअंतर्गत नरेला येथील पॉकेट 3 आणि पॉकेट 6 मध्ये एकूण 2,516 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्धआहेत.  25 टक्के सवलतीच्या दरात हे फ्लॅट विक्रीसाठी असल्याची माहिती डीडीएने दिली. या फ्लॅटची सुरुवातीची किंमत 14.59 लाख आहे. पॉकेट 3 मध्ये 1,020 फ्लॅट्स आणि पॉकेट 6 मध्ये 1,496 फ्लॅट्स आहेत.

 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर हे फ्लॅट बुकिंग केले जात आहेत. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  दिल्लीतील परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत आहे. घर खरेदीसाठी प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनांना लोक प्रसिसाद देत असल्याचे दिसत आहे. नायब राज्यपाल (LG) आणि डीडीएचे अध्यक्ष टी. एस. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ऑनलाइन बुकिंग 

या DDA योजनेअंतर्गत, इच्छुक खरेदीदार ऑनलाइन बुकिंग करून आपल्या पसंतीचा फ्लॅट निवडू शकतात. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत उपलब्धतेनुसार फ्लॅट्सचे वाटप केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी 25 टक्के सवलत, कमी बजेटमध्ये घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना दिलासा देईल अशी अपेक्षा आहे. तथापि, फ्लॅटची उपलब्धता बुकिंगच्या स्थितीवर अवलंबून असेल.

कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी

डीडीएच्या गृहनिर्माण गुंतवणूक योजने अंतर्गत कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी आहे. मर्यादित बजेट असलेल्यांना दिलासा देणारी ही योजना आहे. नरेला येथील या एलआयजी फ्लॅट्सवरील सवलतीच्या किमती खरेदीदारांना कमी किमतीत घरे खरेदी करण्याची संधी देतात. पहिल्याच दिवशी केवळ दोन तासांत 2500 हून अधिक फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india