• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /यमुनेत आढळले शेकडो मृत मासे; छठपूजेआधी मोठी खळबळ; नेमकं कारण काय?

यमुनेत आढळले शेकडो मृत मासे; छठपूजेआधी मोठी खळबळ; नेमकं कारण काय?

दिल्लीतील सोनिया विहारजवळ यमुना नदीत मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळले. सिंचन विभागाच्या तक्रारीनंतर वजीराबाद पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 14, 2026, 10:39 PM IST|Updated: Nov 14, 2026, 10:46 PM IST
joinshare
यमुनेत आढळले शेकडो मृत मासे; छठपूजेआधी मोठी खळबळ; नेमकं कारण काय?
Image Credit: यमुना नदी प्रदुषण

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिल्लीतील यमुना नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार परिसरात नदीच्या पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होऊ लागली. विशेष म्हणजे, छठपूजेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलीय. 15 आणि 16 नोव्हेंबरला यमुना घाटांवर मोठ्या संख्येने भाविक पूजा करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

सिंचन विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

मृत माशांच्या घटनेनंतर दिल्ली सरकारच्या सिंचन आणि पूरनियंत्रण विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक नदीत मृत मासे टाकल्याचा संशय विभागाने व्यक्त केला. यामुळे सरकारची प्रतिमा खराब करण्याचा आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या तक्रारीच्या आधारे वजीराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 353, 352 आणि 240 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

आपकडून प्रदूषणाच्या चौकशीची मागणी

या घटनेने दिल्लीतील भाजप आणि आम आदमी पक्षातील राजकीय संघर्षालाही तोंड फुटले आहे. दिल्लीचे जलमंत्री प्रवेश वर्मा यांनी काही लोक जाणीवपूर्वक नदीत मृत मासे टाकत असल्याचा आरोप केला. यामागे सरकारला बदनाम करण्याचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे का?, याची चौकशी करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळले. यमुनेतील संभाव्य प्रदूषणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आपने केली आहे.

रासायनिक प्रदूषणाचा संशय

स्थानिक नागरिकांनी हथनीकुंड बॅरेजजवळील एका चामड्याच्या कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. माशांचा मृत्यू रासायनिक प्रदूषणामुळे झाला की अन्य कारणामुळे?, हे स्पष्ट करण्यासाठी पाण्याचे आणि मृत माशांचे प्रयोगशाळेत परीक्षण आवश्यक आहे.

छठपूजेपूर्वी यमुनेच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

यमुनेत मृत मासे आढळण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. ऑक्टोबरमध्ये उत्तर दिल्लीतील बुराडी परिसरातही शेकडो मृत मासे आढळले होते. त्यामुळे नदीतील प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक सांडपाण्यावर देखरेख आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या पोलिसांकडून सोशल मीडिया पोस्ट आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
india