• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /52878 कोटींना डील फायनल! सरकार IDBI बँकेतील मोठा हिस्सा विकणार, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

52878 कोटींना डील फायनल! सरकार IDBI बँकेतील मोठा हिस्सा विकणार, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

सरकार IDBI बँकेतील मोठा हिस्सा विकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅनेडियन कंपनीला IDBI बँकेतील हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. 52878 कोटींचा हा व्यवहार आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 14, 2026, 11:12 PM IST|Updated: Oct 14, 2026, 11:20 PM IST
joinshare
52878 कोटींना डील फायनल! सरकार IDBI  बँकेतील मोठा हिस्सा विकणार, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IDBI बँक : आयडीबीआय बँकेतील सरकारचा हिस्सा विक्री केला जाणार आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळ विक्री आणि पुनर्रचनेला मंजुरी मिळाली आहे.  फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज या कंपनीला 60 टक्क्यांहून अधिक हिस्सा विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन भांडवल येणार आहे. परकीय थेट गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. 

मागील अनेक दिवसापांसून आयडीबीआय बँकेच्या खागजीकरणाबाबत चर्चा सुरु आहे. अशातच सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅनेडियन कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जची उपकंपनी असलेल्या कॅनडा इंक.ला आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकण्यास मंजुरी दिली आहे. 

52878 कोटींचा हा व्यवहार आहे.  हा भारतातील वित्तीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणुकीचा (FDI) सर्वात मोठा व्यवहार असल्याचा सरकारचा दावा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) फेअरफॅक्स कंपनीला बँकेसाठी धोरणात्मक खरेदीदार म्हणून मंजुरी दिली आहे. या करारानुसार, केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) त्यांच्या हिश्श्याचा मोठा भाग विकणार आहेत.

सरकार आणि एलआयसीचा किती हिस्सा आहे?

आयडीबीआय बँकेत केंद्र सरकारचा 30.48 टक्के तर,  एलआयसीचा 30.24 टक्के हिस्सा आहे. सरकार आणि एलआयसी आपला हिस्सा विकणार आहे. दोन्ही मिळून  60.72 टक्के हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे.   सरकार आणि एलआयसी बँकेमध्ये आपला काही हिस्सा कायम ठेवणार आहेत.  सरकारकडे 15 टक्के आणि एलआयसीकडे 19 टक्के हिस्सा असेल. एकूण हिस्सा 34 टक्के कायम ठेवला जाणार आहे. तथापि, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी, यशस्वी खरेदीदाराला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियामक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

IDBI  बँकेतील  शेअर विक्रीची प्रक्रिया कशी असेल?

बँकेतील हिस्सा अधिग्रहित करणाऱ्या फेअरफॅक्सच्या कंपनीला आरबीआयकडे आपली पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मध्यवर्ती बँकेच्या नियामक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी एक योजनाही सादर करावी लागणार आहे. दुसरीकडे, सरकारकडे एका विहित प्रक्रियेनुसार, आपल्या उर्वरित 15 टक्के हिश्श्यापैकी काही हिस्सा खुल्या बाजारात विकण्याचा पर्याय असणार आहे. एलआयसीदेखील आपल्या उर्वरित 19 टक्के हिश्श्याचे व्यवस्थापन स्वतःच्या अंतर्गत नियमांनुसार आणि नियामक आवश्यकतांनुसार करावे लागणार आहे.

आयडीबीआय बँक आर्थिक संकटात 

1964 मध्ये एक विकास वित्तीय संस्था म्हणून आयडीबीआय बँकेची स्थापना झाली. 2004  मध्ये तिचे रूपांतर एका व्यावसायिक बँकेत करण्यात आले. आरबीआयने 21 जानेवारी 2019 रोजी तिचे वर्गीकरण खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून केले. या बँकेत सरकार आणि एलआयसीचा मोठा हिस्सा आहे. एके काळी या बँकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. बुडीत कर्जे (एनपीए) आणि तोट्यामुळे सरकार आणि एलआयसीला बँकेत वारंवार भांडवल ओतावे लागले. 2010 ते 2020 या काळात सरकारने बँकेत अंदाजे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india