SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे'; धीरेंद्र शास्त्रींची मोठी मागणी, पाकिस्तानातील हिंदूंसाठी थेट काय म्हणाले?

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पाकिस्तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली. 'पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे' या विधानामुळे चर्चा सुरू आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 18, 2026, 10:19 IST | Updated: Nov 18, 2026, 10:34 IST
Image Credit: धीरेंद्रशास्त्री
Join

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झालीय. पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी त्यांनी केलीय. “पुन्हा एकदा फाळणी झाली पाहिजे,” असं विधान त्यांनी केलंय. पाकिस्तानातील सर्व हिंदूंना भारतात आणण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे आयोजित रामकथेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. याच कार्यक्रमात हिंदू एकजुटीपासून मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

पाकिस्तानातील हिंदूंना भारताचं नागरिकत्व द्या

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना भारताचं नागरिकत्व देण्याची मागणी केली. पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात आणण्यासाठी पुन्हा एकदा फाळणी व्हावी, असंही ते म्हणाले.

हिंदूंना मुस्लिमांपेक्षा हिंदूंकडूनच अधिक धोका?

याच भाषणात शास्त्री यांनी हिंदू समाजातील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केलं. सध्या सनातन धर्माला मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या नावाने कलंक ठरणाऱ्या काही लोकांपासून अधिक धोका असल्याचं ते म्हणाले. हिंदूंनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

हिंदूंसाठी शंभर वेळा माफी मागण्याची तयारी

हिंदूंमध्ये एकजूट टिकून राहावी यासाठी गरज पडल्यास आपण शंभर वेळा माफी मागण्यास तयार असल्याचं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. हिंदूंमध्ये फूट पडू नये, यासाठी अपमान सहन करण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दाही उपस्थित

रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आता मथुरेतही भव्य श्रीकृष्ण मंदिर उभारण्यासाठी हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यासाठी लोकांनी मथुरेला येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

अखिलेश यादव यांच्या विधानावरूनही राजकीय चर्चा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली होती. धार्मिक कथांच्या आयोजनावरून केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी आपली रामकथा निवडणुकीसाठी नसून सनातन धर्मासाठी असल्याचं म्हटलं होतं. कुंडा येथे राजा भैया अर्थात रघुराज प्रताप सिंह यांच्या आयोजनात ही रामकथा सुरू आहे. यावेळी त्यांनी राजा भैया यांचं कौतुक करत प्रत्येक जिल्ह्यात एक राजा भैया असावा, असं विधानही केलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES