• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर; 11लाख कर्मचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर; 11लाख कर्मचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस

रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. 11लाख कर्मऱ्यांच्या 2009 कोटींचा बोनस जाहीर झाला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 14, 2026, 04:54 PM IST|Updated: Oct 14, 2026, 05:07 PM IST
joinshare
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर; 11लाख कर्मचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांंना 78 दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. 11लाख कर्मऱ्यांना या दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत मोठा निर्णय झाला.  रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस जाहीर झाला आहे.  रेल्वे कर्माचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळी भेट दिली आहे.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाली बोनसची घोषणा केली.  

रेल्वेच्या 11 लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मंजूर झाला असून  11.40 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा होणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बोनसला मंजुरी दिली.

रेल्वे कर्मचाऱ्यांना एकूण 2,009.61 कोटी रुपयांचा उत्पादकता आधारित बोनस (PLB) मिळणार आहे.  सुमारे 11 लाख 40 हजार 770 रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे.

प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 17,951 रुपये मिळणार आहेत. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ आणि इतर गट ‘क’ कर्मचाऱ्यांचा यात समावेश. दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणापूर्वी बोनस देण्याची परंपरा आहे. 2025-26 मध्ये रेल्वेने उत्कृष्ट कामगिरी केली.  1,670 दशलक्ष टन मालवाहतूक आणि सुमारे 741 कोटी प्रवाशांची वाहतूक केल्याची माहिती आहे.

पूर्वी अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनसची गणना 7,000 ची वेतन मर्यादा आणि 78 दिवसांच्या पगारावर आधारित होती. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना कमाल वार्षिक बोनस 17,951  मिळतो. तथापि, इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशनने (IRTSA) बोनसची गणना करण्यासाठी वेतन मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती. संघटनेने म्हटले आहे की, स्तर 2 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासह (DA) वेतन मर्यादा 18,000 पर्यंत वाढवावी. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांच्या विविध वेतन स्तरांच्या आधारावर बोनसची गणना करावी, असेही त्यांनी सुचवले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Railway News