शहरं झाली गॅस चेंबर! मुंबई, दिल्लीतील हवा झाली विषारी, श्वास घेणंही धोकादायक; महानगरांचा AQI पाहून बसेल धक्का
फटाक्यांमुळे दिल्ली आणि मुंबईची हवा बनली विषारी. अनेक ठिकाणची हवा अंत्यत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फटाके फोडण्यावर निर्बंध, प्रदूषणाचा वाढता धोका याबाबत वेळोवळी चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसंच, हायकोर्टाने प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याचे आदेशही दिले होते. मात्र या साऱ्या उपाययोजना धाब्यावर बसवत मुंबईकरांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांची आतिषबाजी केली. याचा परिणाम म्हणजे दीपोत्सवानंतर मुंबईतील हवेचा स्तर खालावला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. तर दिल्लीतही हिच परिस्थिती आहे. दिल्ली - NCR मधील वायू प्रदूषणाची स्थितीही अत्यंत गंभीर श्रेणीत आहे.
मुंबईतील हवा प्रदूषणाची तापळी चिंताजनक होत चालली आहे. पहाटेच्या आकडेवारीनुसार आज मुंबईचा एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) 192 वर पोहोचला आहे. काही ठिकाणी तर हवा अत्यंत अस्वस्थ श्रेणीत असल्याचा दर्जा नोंदवण्यात आला आहे.
विभागनिहाय आकडेवारीत शिवाजीनगर, मलाड आणि चेंबूरचा एक्यूआय 200 च्या वर आहे.
मुख्य प्रदूषकांमध्ये PM2.5 चा स्तर 107 µg/m³ आणि PM10 चा स्तर 157 µg/m³ इतका नोंदवला गेला आहे. जो आरोग्यासाठी घातक मानला जातो. त्यामुळं नागरिकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, असं अवाहन करण्यात येत आहे.
मुंबईतील हवेचा स्तर
कलानगर- 264
बीकेसी-231
देवनार-226
घाटकोपर-221
चेंबूर-216
कुलाबा-213
मलाड-213
सायन-1221
वरळी-148
दिल्लीची हवा बनली विषारी
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत कायम आहे. दिल्लीचा सरासरी AQI 366 नोंदवण्यात आला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली असली, तरी हवेतील प्रदूषणाची पातळी अजूनही चिंताजनक आहे. दिवाळीनंतरही दिल्ली-NCR मधील हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिल्लीतील प्रमुख भागांचा AQI:
बवाना – 424
बुराडी – 445
चांदणी चौक – 418
DTU – 431
ITO – 404
जहांगीरपुरी – 439
मुंडका – 413
NIH नरेला – 408
पंजाबी बाग – 408
पटपडगंज – 418
रोहिणी – 435
सोनिया विहार – 449
विवेक विहार – 441
दिल्ली-NCR मध्येही प्रदूषणाची गंभीर स्थिती
नोएडा – 338
गुरुग्राम – 312
गाझियाबाद – 368
फरिदाबाद – 329
मुंबई-दिल्ली बनतेय गॅस चेंबर
मुंबई आणि दिल्ली एक आर्थिक राजधानी तर एक देशाची राजधानी. या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली असून, सध्या ही शहरे 'गॅस चेंबर' बनत चालली आहेत. दोन्ही शहरातील हवेची गुणवत्ता अथ्यंत खराब व धोकादायक श्रेणीत पोहोचली आहे. हवेचा खालावणारा दर्जा पाहता नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. फटाक्यांमधून निघणारे सूक्ष्म कण यामुळं श्वास घेण्याच्या समस्या वाढतात. लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना याचा जास्त धोका असतो.
दरम्यान, प्रदुषण वाढत असताना मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे अवाहन करण्यात आले होते. कोर्टानेही रस्ते, गल्ल्या, पदपथ (फूटपाथ) अशा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रशासनाने प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या मदतीने व्यापक जनजागृती करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे.
पुण्यातही हवेची गुणवत्ता घसरली
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यामुळे हवेची गुणवत्ता घसरली असून गुणवत्ता श्रेणी वाईट नोंदवली आहे. फटाक्यामुळे चौफेर धुराचे लोट तयार झाल्याने प्रदूषण वाढल्याच पाहायला मिळाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर मध्ये हवेचा गुणवंता निर्देशांक 204 नोंदवला असून तो वाईट श्रेणीतला आहे. दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसाच्या निरीक्षणामध्ये काल लक्ष्मीपूजन दिवशी सर्वाधिक वायू प्रदर्शन नोंदवले गेले आहे.