भारताच्या हवामानात भयानक बदल; 20 राज्यांना IMD अलर्ट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय
Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 11 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 20 राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.
11 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या हवामानात भयानक बदल होणार आहे. 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. 11 नोव्हेंबर रोजी या 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत वायव्य भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. मुसळधार पावसामुळे थंडीची जोर वाढू शकतो.
20 राज्यांना अलर्ट
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आसाम, सिक्कीम आणि त्रिपुरा या 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली विकसित होत आहे. असलेली एक हवामान प्रणाली पुढील आठवड्यात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी पावसाने जोर धरला आहे. चेन्नई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) रामनाथपुरम आणि तुतीकोरीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
12 नोव्हेंबरच्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्राकडे वळले आहे. हवामान अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, ही प्रणाली हळूहळू मजबूत होऊन 15 नोव्हेंबरपर्यंत शेजारील श्रीलंकेच्या दिशेने सरकू शकते. ही प्रणाली आणखी मजबूत होऊ शकते आणि तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.