• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मंदिरामध्ये मिळायचं लोन, शालेय इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख; मंदिरांचं मशिदीमध्ये रूपांतर झाल्याचाही दावा

मंदिरामध्ये मिळायचं लोन, शालेय इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख; मंदिरांचं मशिदीमध्ये रूपांतर झाल्याचाही दावा

12 व्या शतकानंतर अनेक मंदिरे आणि मठांची तोडफोड करण्यात आली किंवा त्यांचे मशिदीमध्ये रूपांतर झाले. मात्र, या आक्रमणांनंतरही मंदिरांचे पुनर्निर्माण आणि नवीन बंधकामे सुरूच राहिली, असा उल्लेख पुस्तकात आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 02, 2026, 02:26 PM IST|Updated: Oct 02, 2026, 02:54 PM IST
joinshare
मंदिरामध्ये मिळायचं लोन, शालेय इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख; मंदिरांचं मशिदीमध्ये रूपांतर झाल्याचाही दावा
Image Credit: मंदिरे अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्याचा दावा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'अंडरस्टैंडिंग सोसायटी इंडिया अँड बियाँड पार्ट 2' या पाठ्यपुस्तकातील 'रेजिस्टन्स अँड रेसिली अन्स (1000-1700 सीई)' या प्रकरणात पुरातन मंदिरांसंदर्भात केलेला दावा सध्या चांगलाच चर्चेत आहे.इसवी सन 1000 ते 1700 या कालखंडात मंदिरे ही केवळ पूजेची ठिकाणे नसून, ती मोठी आर्थिक केंद्र आणि राजकीय सत्तेला कायदेशीर मान्यता मिळवून देणारे मुख्य आधारस्तंभ होती, असा दावा 'एनसीईआरटी'ने तयार केलेल्या इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.

राजकीय जीवनाचा मुख्य आधारस्तंभ

नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनी, मंगळवारी 'अंडरस्टैंडिंग सोसायटीः इंडिया अँड बियॉन्ड - भाग 2' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग जूनमध्ये प्रकाशित झाला आहे. या पुस्तकानुसार, "मंदिरे ही त्या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक आणि राजकीय जीवनाचा मुख्य आधारस्तंभ होती. ही धार्मिक केंद्रे कालांतराने प्रमुख आर्थिक केंद्रस्थानी रूपांतरित झाली, ती मोठ्या प्रमाणावरील जमिनींच्या देणग्यांचे व्यवस्थापन करत, शेकडो कुशल कामगारांना रोजगार पुरवत आणि स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आर्थिक संस्था म्हणूनही कार्य करत." असे पाठ्यपुस्तकात म्हटले आहे.

कर्ज पुरवठा करणारी वित्तीय संस्था

आर्थिक दृष्टिकोनातूनही मंदिरे अत्यंत सक्षम संस्था म्हणून उदयास आली होती. मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या जमिनी, दान आणि अनुदानांमुळे मंदिरे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि ग्रामसभांना कर्ज पुरवठा करणारी वित्तीय संस्था बनली होती. वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार, पुजारी, संगीतकार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मंदिरांमधून मोठा रोजगार मिळत असे. याशिवाय कर वसुली आणि स्थानिक पातळीवर न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही मंदिरांकडे होते, असे त्यात म्हटले आहे.

'जगदीशांचे मंदिर मुघल सत्तेला उत्तर'

पुस्तकात नमूद केल्यानुसार, 11 व्या शतकापासून गड़ानवी व घुरी आक्रमणांदरम्यान, तसेच 12 व्या शतकानंतर अनेक मंदिरे आणि मठांची तोडफोड करण्यात आली किंवा त्यांचे मशिदीमध्ये रूपांतर झाले. मात्र, या आक्रमणांनंतरही मंदिरांचे पुनर्निर्माण आणि नवीन बंधकामे सुरूच राहिली. अमेर येथील जगत शिरोमणी मंदिर आणि उदेपूरमध्टो महाराणा जगत सिंग यांनी बांधलेले जगदीशांचे मंदिर ही या धार्मिक आणि राजकीय पुनरुत्यानाची प्रमुख उदाहरणे आहेत. शाहजहानच्या काळात दिल्लीत बांधल्या गेलेल्या जामा मशिदीच्या पार्श्वभूमीवर, महाराणा जगत सिंग यांनी उभारलेले जगदीशांचे मंदिर हे मुघल सत्तेला दिलेले एक धार्मिक आणि राजकीय उत्तर मानले जाते.

'वैयक्तिक आयकर' विषयाचा समावेश

"एनसीईआरटी'ने पहिल्यांदाच इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात 'वैयक्तिक आयकर' या विषयाचा समावेश केला आहे. 'मॅनेजिंग युअर पर्सनल फायनान्सेस' या अध्यायांतर्गत हा विषय समाविष्ट करण्यात आला असून, प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर भरणे हे देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे म्हणटले आहे.  'एनसीईआरटी'चे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वयोगटातील विद्याथ्यर्थ्यांसाठी प्रथमच नवीन कर प्रणालीनुसार टप्प्याटप्प्याने कराची प्रत्यक्ष गणना समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या अध्यावात जुन्या कर प्रणालीचा कोणताही उल्लेख नसून केवळ नवीन कर प्रणालीचा समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Education News
Religious News
Hindu Religion