• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /Explained: ‘कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत’, कॅन्सरवरील औषधांच्या अवाजवी किमतींवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Explained: ‘कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत’, कॅन्सरवरील औषधांच्या अवाजवी किमतींवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

केंद्र सरकारने म्हटले आहे की, औषध कंपन्यांना याचा फायदा झालेला नाही, उलट या दरवाढीमुळे खासगी रुग्णालयांनाच फायदा होण्याची शक्यता आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 05:32 PM IST|Updated: Sep 29, 2026, 05:43 PM IST
joinshare
Explained: ‘कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत’, कॅन्सरवरील औषधांच्या अवाजवी किमतींवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

किरकोळ विक्रेत्यांना कॅन्सरवरील औषधांचा पुरवठा करताना आकारली जाणारी किंमत आणि रुग्णांकडून आकारली जाणारी किंमत यांच्यातील तफावतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एवढ्या मोठ्या फरकाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि औषधांवर एकसमान 16 टक्के मार्जिन देण्याची मागणी केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर औषधांच्या किमती, जेनेरिक प्रिस्क्रिप्शन आणि औषधांच्या (किंमत नियंत्रण) आदेश, 2013 अंतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या किंमतींच्या नियंत्रणासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने केंद्राला रुग्णालयांनी औषधे खरेदी करणे बंधनकारक करण्याच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि या प्रणालीचा त्रास सामान्य माणसांना होत असल्याचे सांगितले.

"हा नरसंहार आहे. कर्करोगाच्या औषधाची किंमत 27,000 रुपयांची एमआरपी असूनही किरकोळ विक्रेत्यांना 2,700 रुपयांना पुरवठा केला जात आहे," असे खंडपीठाने केंद्रातर्फे हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. अशा व्यवस्थेमुळे सर्वसामान्य माणसालाच त्रास होतो असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

औषधांच्या किमतींवर चर्चा करताना न्यायालयाने कॉर्पोरेट रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. "कॉर्पोरेट रुग्णालये कोणालाही सोडत नाहीत. ते मृतदेहसुद्धा बाहेर नेऊ देत नाहीत. औषधनिर्माण क्षेत्राला याची पर्वा नाही," असे खंडपीठाने म्हटले.

सुरुवातीलाच, मेहता म्हणाले की, त्यांना एक मार्ग शोधण्याची आणि काहीतरी संतुलन साधण्याची गरज आहे. न्यायमूर्ती मेहता म्हणाले, "हा भेद का? अत्यावश्यक किंवा गैर-अत्यावश्यक याने काही फरक पडत नाही का? प्रत्येक गोष्टीच्या एमआरपीवर 16 टक्के नफा का ठेवू नये?

"काय होते याचा विचार करा. सरतेशेवटी, याचा परिणाम असा होतो की करदात्यांना त्रास सहन करावा लागतो. कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये, कर्करोगाच्या एका अत्यावश्यक औषधाची एमआरपी 27 हजार रुपये होती, तर किरकोळ विक्रेत्याला (पीटीआर) त्याची किंमत 2700 रुपये होती. फक्त फरक बघा," सॉलिसिटर जनरल म्हणाले की, त्यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची आणि या मुद्द्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे त्यांनी मान्य केले.

न्यायमूर्ती मेहता पुढे म्हणाले की, सरकारने या मुद्द्याकडेही लक्ष दिले पाहिजे की, अनेक कॉर्पोरेट रुग्णालये असा नियम करतात की रुग्णांनी त्यांच्या केमिस्टकडून किंवा एखाद्या ठराविक फार्मसीमधूनच औषध खरेदी करावे आणि जर रुग्णाने ते बाहेरून घेतले, तर ते उपचारांची हमी देत ​​नाहीत.

"जर तो रुग्ण सरकारी योजनेअंतर्गत उपचार घेत असेल, तर त्याचा परतावा कोण देतो? करदाता देतो. मग एकसमान निकष का नाहीत? डीपीसीओ (DPCO) 16 टक्के नफा आकारते. प्रत्येक औषध अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येते. त्यांना अशा प्रकारे किंमती निश्चित करण्यास का सांगितले जाते, हे आम्हाला कळत नाही," असे ते म्हणाले.

न्यायमूर्ती मेहता यांनी सॉलिसिटर जनरल यांना पुढे सांगितले की, जर एखाद्याला खूप माणुसकी असलेला फार्मासिस्ट भेटला आणि त्याने गरजू व्यक्तीला 2700 रुपयांमध्ये औषध देण्याचे वचन दिले, तर रुग्ण विचार करू लागेल की ते औषध अस्सल आहे की बनावट. "प्रश्न हा आहे की हा 10 पट नफा का? पैशाचा हा मोठा हिस्सा कुठे जातो? याचा फायदा कोणाला होतो?"

"अखेरीस, प्रामाणिक करदात्याचेच नुकसान होणार आहे. आम्ही या मुद्द्याची सखोल तपासणी करू. याचा समाजातील मोठ्या वर्गावर परिणाम होतो," असे खंडपीठाने म्हटले. तसेच, प्रथम मुद्दा दरांचा आणि त्यानंतर वैद्यकीय व्यावसायिकांच्या नैतिक कार्यपद्धतीचा आहे, असेही खंडपीठाने पुढे नमूद केले.

मेहता पुढे म्हणाले की, औषध कंपन्यांना यात फायदा होत नाही, उलट खाजगी रुग्णालयांनाच फायदा होत असल्याचे दिसते. "मला अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊ द्या. मला दोन आठवडे द्या," असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती मेहता म्हणाले की, कॉम्बिनेशनशिवाय एका साध्या स्टॅटिनची किंमत 40 रुपये आहे आणि ऍस्पिरिनच्या कॉम्बिनेशनसह त्याची किंमत 70 रुपये आहे.

"हे कसे घडत आहे? कॉर्पोरेट रुग्णालये म्हणजे उद्योग आहेत. ही अजिबात सेवा नाही. सामान्य माणसाने हे सर्व का सहन करावे?" असे खंडपीठाने सॉलिसिटर जनरल यांना सांगितले. सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले, "मी असे म्हणत नाही की याचिकाकर्ते चुकीचे आहेत, परंतु समतोल साधणारा एखादा मार्ग शोधावा लागेल. माझ्या माहितीनुसार, फार्मा कंपन्यांना याचा फायदा होत नाही." खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय केंद्राचे उत्तर ऐकणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supreme court