SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सर्वात मोठी बातमी! शिवसेना सुनावणीची अंतिम तारीख सुप्रीम कोर्टानेच केली जाहीर; 'या' तारखेआधी संपणार युक्तिवाद

2023 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु असून आता सर्वोच्च न्यायालयानेच ही सुनावणी कोणत्या तारखेआधी पूर्ण केली जाणार याचा थेट उल्लेख केलाय. किती तारखेआधी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणार जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 09, 2026, 12:55 PM IST | Updated: Oct 09, 2026, 01:23 PM IST
Image Credit: सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केली तारीख (प्रातिनिधिक फोटो)
Join

सर्वोच्च न्यायालयामध्ये 2023 पासून सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील याचिकेमध्ये मागील महिन्यापासून नियमित सुनावणी सुरु झाली आहे. या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही युक्तीवाद न्यायालयाने ऐकून घेतला आहे. सदर प्रकरणामध्ये आता निवडणूक आयोगाचा युक्तिवादही ऐकला जाणार असतानाच या प्रकरणाची सुनावणी कधीपर्यंत चालणार आहे याची तारीखच जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही घोषणा केली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लवकरच लागणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

तारीख कोणती?

ॲाक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरण संपणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने आज एका सुनावणीदरम्यान तोंडी सांगितले. निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात मांडली जाणार आहे.  त्यानंतर उद्धव ठाकरेंचे रिजॉईंडर तिसऱ्या आठवड्यात होईल. आज सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगाल एसआयआरची सुनावणी त्वरीत घ्यावी अशी विनंती वकीलांर्फत करण्यात आली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की 30 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर बंगाल एसआयआर प्रकरण घेतले जाईल, असं सांगितलं.

2022 पासून आजपर्यंत काय काय झालं?

2022: फूट आणि तातडीच्या सुनावण्या

20-21 जून 2022: विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. त्यानंतर शिंदे यांच्यासह आमदार सुरत-गुवाहाटीकडे गेले.

26 जून 2022: शिंदे गटाने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अपात्रतेच्या नोटीसांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

27 जून 2022: सुट्टीकालीन खंडपीठाने अपात्रतेची कार्यवाही स्थगित केली आणि बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला.

29 जून 2022: न्यायालयाने राज्यपालांनी मागवलेल्या बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

30 जून 2022: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

23 ऑगस्ट 2022: कायदेशीर मुद्दे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर पाठवण्यात आले.

2023: निवडणूक आयोग आणि घटनापीठाचा निकाल

ऑक्टोबर 2022: निवडणूक आयोगाने अंतरिम आदेशाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले. उद्धव गटाला तात्पुरते मशाल चिन्ह दिले.

17 फेब्रुवारी 2023: निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. उद्धव गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ आणि मशाल चिन्ह दिले. आयोगाने विधिमंडळातील बहुमताचा (सुमारे 76 टक्के मतं) आधार घेतला.

21 फेब्रुवारी–16 मार्च 2023: संकटासंबंधीच्या याचिकांवर अंतिम सुनावणी; निकाल राखून ठेवला.

11 मे 2023: घटनापीठाने एकमताने निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला न तोंड देता राजीनामा दिल्याने सरकार पूर्ववत करता येणार नाही, असे म्हटले. राज्यपालांची बहुमत चाचणीची हाक बेकायदेशीर होती, आणि शिंदे गटाच्या व्हिपची नियुक्ती बेकायदेशीर होती, असेही नमूद केले. सरकारची स्थिती कायम राहिली. अपात्रतेच्या याचिका अध्यक्षांनी वेळेत निकाली काढाव्यात, असे निर्देश दिले.

2024: अध्यक्षांचा निर्णय आणि आव्हाने

10 जानेवारी 2024: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. शिंदे गटाला विधिमंडळात ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली. 1999 ची घटना वैध मानली; 2018 च्या सुधारणांना आधार दिला नाही.

2024: उद्धव गटाने अध्यक्षांच्या निर्णयाला आणि निवडणूक आयोगाच्या 17 फेब्रुवारी 2023 च्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. (सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे इत्यादी याचिका.)

2025-2026: अंतिम सुनावणी

12 नोव्हेंबर 2025: न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह वाद 21 जानेवारी 2026 पासून अंतिम सुनावणीसाठी ठेवले. दोन्ही बाजूंना वेळमर्यादा दिली.

ऑगस्ट 2026: उद्धव गटाच्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरू. कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष राजकीय पक्षावर नियंत्रण मिळवू शकत नाही, असा युक्तिवाद केला.

सप्टेंबर–ऑक्टोबर 2026: सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू. न्यायालयाने विधिमंडळ बहुमताच्या कसोटीवर प्रश्न उपस्थित केले आणि दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह देण्याचा पर्यायही विचारला. शिंदे गटाचे नीरज किशन कौल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले (2011 नंतरची घटना आयोगाकडे सादर झाली नसल्याचा दावा, मतदानातील वाटा). 6-8 ऑक्टोबर 2026 दरम्यान युक्तिवाद सुरू होते; सुनावणी अपूर्ण होती आणि पुढे चालू राहणार होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES