Explainer : ऐन सणासुदीत विमान प्रवास महागला! प्रसिद्ध एअरलाइन्सने तिकिटांचे दर एक ते दहा हजारांनी वाढवले, कारण काय?
84 वर्षानंतर मुंबई विमानतळाचे टर्मिनल 1 हे २५ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. दुसरीकडे ऐन सणासुदीत विमान प्रवास महाग झाला आहे. प्रसिद्ध एअरलाइन्सने तिकिटांचे दर एक ते दहा हजारांनी वाढवले आहेत.
ऐन दसरा आणि दिवाळीच्या सणांमध्ये विमान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सणांसुद्दीच्या काळात लोक मूळ गावी किंवा फिरण्यासाठी बाहेर जातात. अशावेळी कमी वेळा लवकर आणि आरामदायी प्रवासासाठी ते विमानचा पर्याय निवडतात. पण विमान प्रवासांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोबरपासून प्रसिद्ध विमान कंपनी इंडिगोने आपल्या देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास असो, तो महागला आहे. या कंपनीने आपल्या इंधन शुल्कात वाढ केल्यामुळे विमान तिकीट महागले आहेत.
कंपनीकडून सांगण्यात आलंय की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती भडकल्यामुळे विमान इंधनाचे दर प्रंचड वाढले आहेत. यामुळे कंपनीने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
ATF च्या किमतीत मोठी वाढ
गेल्या काही दिवसांत विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. त्याचा थेट परिणाम जेट फ्युएलच्या किमतीवरही झाला आहे.
जेट फ्युएलच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, विमान इंधनाचे दर गेल्या दशकातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा मोठा वाटा असल्याने ATF महागल्याचा परिणाम तिकिटांच्या दरांवर होणे अपेक्षित होते.
देशांतर्गत प्रवासासाठी किती सरचार्ज?
देशांतर्गत मार्गांवर प्रवासाच्या अंतरानुसार फ्यूल सरचार्ज निश्चित करण्यात आला आहे. नव्या दरांनुसार ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ३७५ रुपये, तर २,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी १,३०० रुपयांपर्यंत सरचार्ज आकारला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्यूल सरचार्जमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. विविध देश आणि प्रदेशांनुसार हे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
तीन महिन्यांत ATFच्या दरात जवळपास २५ टक्क्यांची वाढ
जेट फ्यूलच्या किमतीत झालेली सातत्यपूर्ण वाढ हा इंडिगोच्या निर्णयामागील प्रमुख कारण आहे. १ ऑक्टोबरपासून ATFची किंमत सुमारे १२१ रुपयांवरून १३७ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही सलग तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये ATFच्या दरात सुमारे ५ रुपये प्रति लिटर, तर सप्टेंबरमध्ये ६.२८ रुपये प्रति लिटरची वाढ झाली होती. ऑक्टोबरमधील वाढीसह गेल्या तीन महिन्यांत जेट फ्यूलच्या किमतीत जवळपास २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
इंडिगोच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत फ्यूलच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, ATFची किंमत गेल्या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.