• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'रस्ता नाही, तर विमानाने जायला हवं होतं...,' टायगरच्या हल्लेखोरांना कारने घेऊन गेल्याने मुंबई पोलिसांवर संतापले युपीचे माजी DGP

'रस्ता नाही, तर विमानाने जायला हवं होतं...,' टायगरच्या हल्लेखोरांना कारने घेऊन गेल्याने मुंबई पोलिसांवर संतापले युपीचे माजी DGP

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना उत्तर प्रदेशातून मुंबईला रस्तेमार्गे नेल्याने उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांनी नाराजी जाहीर केली आहे. ही पद्धत योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 07:22 PM IST|Updated: Oct 20, 2026, 07:34 PM IST
joinshare
'रस्ता नाही, तर विमानाने जायला हवं होतं...,' टायगरच्या हल्लेखोरांना कारने घेऊन गेल्याने मुंबई पोलिसांवर संतापले युपीचे माजी DGP
Image Credit: टायगरच्या हल्लेखोरांना उत्तर प्रदेशातून कारने मुंंबईला नेण्यात आलं

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींना मुंबईला आणलं जात आहे. मुंबई पोलीस त्यांना घेऊन निघाले आहेत. हल्ल्यानंतर रिहान, फूल सिंग आणि हृतिक कुमार (उर्फ रोशन) या तिन्ही हल्लेखोरांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर, पोलीस या तिन्ही आरोपींना दोन  गाड्यांमधून मुंबईला घेऊन जात होते. सुरुवातीला फूल सिंग आणि हृतिक कुमार एका वाहनात होते, तर रिहान दुसऱ्या वाहनात होता. मात्र वाटेत पोलिसांनी रिहानला इतर दोघांच्या वाहनात हलवले. पोलिसांच्या ताफ्यामागे प्रसारमाध्यमांची वाहनेही आहेत.

'आरोपींना रस्तेमार्गे मुंबईला नेणं योग्य नाही'

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी 'झी न्यूज'शी संवाद साधताना मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोपींना अशाप्रकारे नेण्यावर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. इतक्या हायप्रोफाइल प्रकरणातील आरोपींना अशाप्रकारे रस्त्याने घेऊन जाणं योग्य नाही. यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

'विमानाची करायलाहवी होती व्यवस्था'

त्यांनी म्हटलं आहे की, "प्रत्येक राज्य सरकारकडे राजकीय विमानं असतात. त्यातील एका विमानाचा अशा प्रकरणात वापर केला पाहिजे.  जेणेकरुन आरोपींना 24 तासात स्थानिक न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं. अशाप्रकारे रस्तेमार्गे हल्लेखोरांना राजस्थानहून मुंबईला घेऊन जाणं धोकादायक आहे".

दरम्यान, पोलीस तपासातून समोर आले आहे की, हल्लेखोरांनी 11 ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्या दिवशी टायगर फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर न आल्यामुळे त्यांची योजना अयशस्वी ठरली. त्यानंतर, 18 ऑक्टोबरला त्यांना पुन्हा एक संधी मिळाली होती.

18 ऑक्टोबरला टायगरवर हल्ला

रविवारी संध्याकाळी, मुंबईतील जुहू येथील एका मैदानावर फुटबॉल खेळून टायगर श्रॉफ कारने घरी परतत होता. यावेळी बाहेर वाट पाहत थांबलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केला. हल्लेखोरांपैकी एक जण मोटारसायकलवरच थांबला होता, तर इतर दोघे खाली उतरले होते. या दोघांनी गाडीच्या पुढच्या आणि डाव्या बाजूला लक्ष्य करून पाच गोळ्या झाडल्या. टायगरने वेळीच खाली वाकून स्वतःचा बचाव केला, ज्यामुळे तो या हल्ल्यातून सुदैवाने वाचला. मात्र, या गोळीबारात त्याचा चालक आणि एक व्यक्ती जखमी झाले. घटनेनंतर, तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळून गेले.

 

Ratlam, Madhya Pradesh: Mumbai Police are taking three accused, including Rehan, Hrithik and a minor, from Kota to Mumbai in connection with the Tiger Shroff firing case under tight security. Kota Police apprehended the accused and handed them over to Mumbai Police. https://t.co/wniyWh7iXf

— IANS (@ians_india) October 20, 2026

 

आरोपी लॉरेन्स टोळीशी संबंधित

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी फूल सिंग आणि रिहान ऊर्फ सुक्खा हे हरियाणातील सोनीपतचे रहिवासी आहेत, तर रितिक कुमार ऊर्फ रोशन हा बिहारमधील बेगुसरायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रितिक मुंबईत राहत होता आणि 'रॅपिडो' (Rapido) रायडर म्हणून काम करत होता. हे तिघेही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संबंधित असल्याचे समजते. मुंबई पोलीस सध्या या घटनेच्या सर्व  बाजूंनी तपास करत आहे, ज्यामध्ये गुन्ह्यामागचा हेतू आणि संशयितांचे या गुन्हेगारी टोळीशी असलेले संबंध यांचा समावेश आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Mumbai