• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /98,629 रुपये एक तोळा; अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला; सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली

98,629 रुपये एक तोळा; अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला; सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली

सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या जवळ येत चालला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 98,629 रुपयांवर आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 18, 2026, 21:12 IST|Updated: Nov 18, 2026, 21:22 IST
joinshare
98,629 रुपये एक तोळा; अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला; सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Silver Rate : सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 98,629 रुपयांवर आला आहे.  दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र कायम आहे. 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 2 हजार 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 36 हजार रुपये, तर चांदीचे दर 1 लाख 74 हजार रुपये झाले आहेत.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 3,200 रुपयांनी, म्हणजेच 2.38 टक्क्यांनी घसरून 1,31,027  रुपयांवर आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचे दर 5,900 रुपयांनी म्हणजेच 3.47 टक्क्यांनी घसरून 1,63,818 प्रति किलो झाले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांवर निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात ही घसरण झाली आहे.

 फेडरल रिझर्व्ह आपल्या डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर वाढवू शकते.  आणखी दरवाढ देखील अपेक्षित आहे.  जर असे झाले, तर महागाई वाढेल. बॉण्ड बाजारात तेजी येईल. व्याजदर उच्च राहतील. यामुळेच सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांच्या किंमतीत आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात सोन्याचा दर 2.15 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 3,780.40 डॉलर झाला आहे, तर चांदीचा दर 3.15 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 45.865 डॉलर झाला आहे.

सोने 60 हजार रुपयांनी स्वस्त

सोने आणि चांदीच्या किंमती विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरण झाली आहे. जानेवारी 2026 मध्ये सोन्याचा दर 1.87 लाखांपर्यंत पोहचला होता. आता सोन्याचा दर प्रती तोळा 1.31 ते 1.36  लाखांवर आला आहे. सोन्याच्या दरात 62,000 रुपयांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दराने 4.20 लाखांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता चांदीचा दर 1.63 लाखांवर आला आहे. चांदी जवळपास 2.57 लाखांनी स्वस्त झाली आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price