98,629 रुपये एक तोळा; अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला; सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली
सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या जवळ येत चालला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 98,629 रुपयांवर आला आहे.
Gold Silver Rate : सोनं चांदीच्या दराबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. अखेर सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली आला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 98,629 रुपयांवर आला आहे. दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र कायम आहे. 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 2 हजार 800 रुपयांची, तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 36 हजार रुपये, तर चांदीचे दर 1 लाख 74 हजार रुपये झाले आहेत.
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 3,200 रुपयांनी, म्हणजेच 2.38 टक्क्यांनी घसरून 1,31,027 रुपयांवर आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचे दर 5,900 रुपयांनी म्हणजेच 3.47 टक्क्यांनी घसरून 1,63,818 प्रति किलो झाले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांवर निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात ही घसरण झाली आहे.
फेडरल रिझर्व्ह आपल्या डिसेंबरच्या बैठकीत व्याजदर वाढवू शकते. आणखी दरवाढ देखील अपेक्षित आहे. जर असे झाले, तर महागाई वाढेल. बॉण्ड बाजारात तेजी येईल. व्याजदर उच्च राहतील. यामुळेच सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांच्या किंमतीत आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 2.15 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 3,780.40 डॉलर झाला आहे, तर चांदीचा दर 3.15 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 45.865 डॉलर झाला आहे.
सोने 60 हजार रुपयांनी स्वस्त
सोने आणि चांदीच्या किंमती विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरण झाली आहे. जानेवारी 2026 मध्ये सोन्याचा दर 1.87 लाखांपर्यंत पोहचला होता. आता सोन्याचा दर प्रती तोळा 1.31 ते 1.36 लाखांवर आला आहे. सोन्याच्या दरात 62,000 रुपयांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दराने 4.20 लाखांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता चांदीचा दर 1.63 लाखांवर आला आहे. चांदी जवळपास 2.57 लाखांनी स्वस्त झाली आहे.