लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी खळबळ! सोनं चांदी स्वस्त, दर एकदम घसरले
लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं चांदीच्या दरात घसरण झाली. यामुळे सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊया सोनं चांदीचा दर किती आहे.
Gold Rate : दिवाळीच्या सणाला भारतात मोठ्या प्रमाणाच सोनं चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी भारताच्या गोल्ड मार्केटमध्ये प्रचंड मोठी घसरण झाली. यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सराफांच्या दुकानांमध्ये दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली. तर, दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणारे धास्तावले आहेत.
लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर सोन्याचा दर घसरला
मागील महिन्याभरापासून सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सोन्याचा दर 1.48 लाख ते 1.41 लाखांपर्यंत स्थिरावला आहे. दुसरीकडे चांदीचे दर देखील कोसळले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने सोने आणि चांदीच्या बाजारात किंचतशी तेजी दिसून आली.
देशाचा वायदा बाजार असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील मुहूर्त ट्रेडिंग 2026 दरम्यान, सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात 500 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. चांदीचा दर पुन्हा एकदा 1.85 लाख रुपये प्रति किलोच्या वर गेला, तर सोन्याच्या दरही 1.42 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचला. रविवारमुळे परदेशी वायदे बाजार बंद आहेत. परंतु भारतात दिवाळीसाठी मुहूर्त व्यवहार झाले. या काळात सोने आणि चांदीची लक्षणीय खरेदी झाली.
जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी
दिवाळीच्या सणानिमित्त चांदी खरेदीसाठी ग्राहकांची जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मोठी गर्दी झाली. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीचे दर स्थिर राहिले. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 46 हजार 300 रुपये आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 93 हजार 700 रुपये एवढे आहेत. सोन्या आणि चांदीच्या दरात कुठलीही वाढ अथवा घसरण नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजनचा मुहूर्त असतो. पूजनासाठी लक्ष्मीचे सोन्याचे आणि चांदीचे शिक्के घेऊन जाण्याकडे नागरिकांचा कल पहायला मिळाला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.