2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले? आकडा पाहून डोळे गरगरतील; 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येणार?
सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशातच 2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले याबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Gold-Silver Rate: सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दराने उच्चांकी विक्रम गाठला होता. सोन्याचा दर 1.84 लाखाच्या आसपास गेला होता. तर, चांदीचे दर देखील 4 लाखाच्या वर गेले होते. सोनं चांदीच्या दरात प्रचंड घरसण झाली आहे. सोनं जवळपास 53,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाख रुपयांनी स्वस्त झाली. 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. 2027 मध्ये सोनं चांदीचा दर विक्रमी उच्चांक गाठू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
ऑक्टोबर 2026 पासून सोनं चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. अचानक किंमती झपाट्याने वाढत आहेत. तर कधीकधी प्रचंड घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. 2027 पर्यंत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
अमेरिकन डॉलर, व्याजदर, चलनवाढ आणि जागतिक आर्थिक तणाव यामुळे सोनं चांदीच्या दरावर दबाव येत आहे. चीनसह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोनं खरेदी यामुळे देखील दरांमध्ये मोठे बदल होत आहेत.
2027 पर्यंत किती असले सोन्याचा दर?
2027 पर्यंत सोन्याचा दर किती असेल याबबात जेपी मॉर्गनने धक्कादयक अहवाल दिला आहे. 2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस 6,000 डॉलर म्हणजेच अंदाजे 5.5 लाख रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2027 च्या अखेरीस प्रति औंस 6,300 डॉलर अंदाजे 5.8 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा दावा केला जात आहे. रुपया-डॉलर विनिमय दर विचारात घेतल्यास, या अंदाजानुसार भारतीय बाजारात सोन्याची दर प्रती तोळा अंदाजे 2.13 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
सोन्याच्या दरात वाढ का होत आहे?
अमेरिकन डॉलर आणि बॉण्डवरील परतावा (यील्ड) याचा मोठा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. डॉलर कमकुवत होतो किंवा बॉण्डवरील परतावा कमी होतो, तेव्हा सोने गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय बनू शकते. मजबूत होणारा डॉलर आणि वाढलेले व्याजदर सोन्याच्या किमतींवर दबाव आणत आहेत.
सोन्याचा दर दोन लाखाच्या वर जाऊ शकतो?
सोन्याचा दर 2 लाख रुपयांच्या पुढे जाण्यासाठी अनेक कारणे आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर जागतिक परिस्थिती सोन्यासाठी अनुकूल राहिली, तर 2027 पर्यंत एक तोळा सोन्याचा दर 1,70,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. चीनसह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदीदेखील मागणीला आधार देऊ शकते.