SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

2.5 किलो सोनं, 1.6 किलो चांदी, गाड्या अन् पैशांनी भरलेल्या बॅगा; अधिकाऱ्याच्या घरी सापडली पगारापेक्षा 560 टक्के अधिक संपत्ती, कर्मचारी पैसे मोजून दमले

लोकायुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत अधिकाऱ्याने आपल्या पत्नी आणि इतर काही व्यक्तींच्या मदतीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 228 टक्क्यांनी अधिक होती.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 12:00 PM IST | Updated: Nov 15, 2026, 12:04 PM IST
Image Credit: अधिकाऱ्याच्या घरी सापडलं करोडोंचं घबाड
Join

मध्य प्रदेश लोकयुक्तांनी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यावेळी त्यांच्याकडे एकूण 7.6 कोटींची संपत्ती सापडली आहे. संजीव कुमार शर्मा हे पचमढी येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. अद्याप तपास सुरु असून संपत्तीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकयुक्तांकडे एक तक्रार आली होती, ज्यामध्ये संजीव कुमार शर्मा यांनी आपली पत्नी आणि इतर काही व्यक्तींच्या मदतीने त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक संपत्ती जमा केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीतून त्यांची मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 228 टक्के अधिक असल्याचं उघड झालं. त्यानंतर 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला.

कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतर लोकायुक्तांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. लोकायुक्तांच्या स्वतंत्र पथकांनी पचमढी येथील त्यांचे शासकीय निवासस्थान व कार्यालय, तसेच छिंदवाडा येथील त्यांचे खाजगी निवासस्थान येथे धाड टाकत शोध घेण्यास सुरुवात केली. भोपाळ विभागातील एका पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

लोकायुक्तांच्या प्राथमिक माहितीनुसार, या शोधमोहिमेत 26 लाख 36 हजार 800 रुपये रोख रक्कम सापडली. याव्यतिरिक्त, सुमारे साडेतीन कोटी रुपये किमतीचे 2.528 किलो सोने आणि सुमारे 2  लाख 94 हजार रुपये किमतीचे 1.656 किलो चांदीही जप्त करण्यात आली.

चार वाहने जप्त

याशिवाय एक स्कॉर्पिओ, एक महिंद्रा केयूव्ही (KUV), एक रॉयल एनफिल्ड बुलेट आणि एक स्कूटर अशी चार वाहनंही जप्त करण्यात आली आहेत.  या सर्वांची एकत्रित किंमत सुमारे 31.2 लाख रुपये आहे. तसंच, संबंधित ठिकाणाहून सुमारे 50 लाख रुपये किमतीचे घरगुती साहित्यही सापडले आहे.

तपास पथकाला शर्मा यांच्याशी संबंधित इतर दोन मालमत्तांची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक 'इकोटेल रिसॉर्ट' (Ecotel Resort) आहे, ज्याचे मूल्य सुमारे 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरी मालमत्ता 'सेरेनिटी द व्हिला' (Serenity the Villa) असून तिचे मूल्य सुमारे 1 कोटी रुपये आहे.

तपास पथकाने जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित 28 कागदपत्रे जप्त केली आहेत. हॉटेल आणि रिसॉर्टचे अधिकृत मूल्यमापन अद्याप झालेले नाही, त्यामुळे एकूण मालमत्तेचे मूल्य आणखी वाढू शकते.

उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा सुमारे 560 टक्के अधिक संपत्ती

लोकायुक्तांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेचे प्राथमिक मूल्य सुमारे 7.6 कोटी रुपये आहे. हे मूल्य शर्मा यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा सुमारे 560 टक्के अधिक आहे. तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे की, हा आकडा केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे. जमिनीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर आणि हॉटेल व रिसॉर्टचे अधिकृत मूल्यमापन झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. सध्या शोधमोहीम सुरू असून, लोकायुक्त पथक इतर ठिकाणांवरही छापे टाकू शकते.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES