गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली आहे. कालच्या मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले होते. मात्र आज सोन्याच्या दरांत मोठे उलटफेर झाले आहेत. आज मुंबईसह महाराष्ट्रात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे.
गुरुवारी एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच, 4 डिसेंबरचे वायदे सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.22 लाख रुपयांवर होता. आदल्या दिवशी या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.21 लाख रुपयांपर्यंत घसरला होता. त्यात 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळं आज सोन्याचा वायदा 1600 रुपयांनी वाढून 1,22,769 रुपयांवर स्थिरावला आहे.
दरम्यान, जानेवारी 2026मध्ये सोन्याच्या दरांत उच्चांकी वाढ झाली होती. मात्र गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरणींमुळं सोनं 51,700 रुपयांनी घसरले आहे. तर, नोव्हेंबर महिन्यातच तब्बल 13 टक्के इतकी घट झाली आहे.आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,589 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 11,540 रुपये प्रति ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 9,442 रुपये प्रति ग्रॅमवर स्थिरावली आहे.
सोन्याच्या दराने उसळी घेतल्यानंतर आता चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. आज चांदी प्रतिग्रॅम 165 रुपये असून 1,65,000 रुपये प्रति किलोइतकी आहे. आज चांदीच्या दरांनी अचानक 3 टक्के इतकी वाढ झाली आहे.
गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली असली तरी, त्यांच्या किमती उच्चांकापेक्षा खूपच खाली आहेत. वायदे बाजारात चांदीचा भाव 29 जानेवारीच्या 4,20,048 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा प्रति किलोग्राम सुमारे 2.63 लाख रुपयांनी कमी आहे, तर सोन्याचा भावही 1.93 लाख रुपयांच्या उच्चांकापेक्षा प्रति 10 ग्रॅम सुमारे 70,000 रुपयांनी कमी आहे.
| ग्रॅम | 24K | 22K | 18K |
| 1 | 12,589 | 11,540 | 9,442 |
| 8 | 1,00,712 | 92,320 | 75,536 |
| 10 | 1,25,890 | 1,15,400 | 94,420 |