Gold Rate : सोनं चांदीच्या दराचा बबल फुटला आहे. सोनं चांदीचे दर उच्चांकी दरापेक्षा लक्षणीयरित्या घसरले आहेत. 7 महिन्यांनंतर सोन्यााचे दर 1.36 लाखा रुपयांवर आले आहेत. 3 दिवसांत सोनं 6,611 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे दर देखील उच्चांकी दरावरुन 1.77 लाखांवर आला आहे. सध्याची जागतिक आर्थिक स्थिती पाहता सोन्याचे दर सोन्याचे दर आणखी घसरु शकतात. सोन्याचा दर एक लाखावर येण्यासाठी फक्त 36 हजार रुपयांचा फरक आहे. डिंसेबर 2026 मध्ये सोन्याबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरु शकते सोन्याचा दर 1 लाखाच्या खाली येवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दाराने सर्वात उच्चांकी विक्म नोंदवला होता. एक तोळा सोन्याचा दर 1.83 लाखांपर्यंत पोहचला होता. तर चांदीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. 7 महिन्यांनंतर सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. एकूणच सोन्याच्या दरात जवळपास 50,000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. एका तोळा सोन्याचा दर 1.36 लाखाच्या खाली आला आहे. चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 2.40 लाखांची घरसण झाली आहे. चांदीचा दर 1.77 लाखांपर्यंत आला आहे.
15 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर 1,35,809 रुपयांवर आला. चांदीचा दर 1.81 लाख रुपयांवरून 1.78 लाख रुपयांवर आला आहे. सलग तीन दिवसांत सोन्याच्या भावात 3,611 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी जास्त दराने सोन्या-चांदीची विक्री केल्याने दरात घट झाली आहे.
सणासुदीपूर्वी सोन्याचे दर वाढले होते. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी आपले सोने विकायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलर आणि बॉण्ड्स मजबूत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. विक्रमी दर पाहून, सामान्य खरेदीदारांनी खरेदी कमी केल्याने दर घसरले आहेत. सौर आणि इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जागतिक मंदीमुळे या उद्योगांकडून मागणी कमी झाली आहे. शेअर आणि वायदे बाजारातील चढउतारामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी अचानक आपली चांदी विकली, ज्यामुळे किमती झपाट्याने घसरल्या.
सोन चांदीच्या दरात सुरु असलेली घरसण दीर्घकाळ चालणारी आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात सराफा बाजारात आणखी मोठी गरसण होऊ शकते. बँक ऑफ अमेरिकाने (BofA) सोन्याचा दरात मोठी घरसण होऊ शकते असा दावा केला आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालानुसार, जानेवारी 2026 मध्ये प्रति औंस सुमारे 5,595 डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली. घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति औंस सुमारे 3,700 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. भारतीय चलनात, ही किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.12 लाख रुपये इतकी आहे. सोन्याचा दर 3,250 डॉलरवर आल्यास भारतीय चलनानुसार एक तोळा सोन्याचा दर एक लाखाच्या खाली म्हणजेच 98,000 रुपयांपर्यत होऊ शकतो.
गोल्ड मार्केटची सध्याची स्थिती पाहता सोन्याचा दर एक लाखाच्या खाली येवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेची फेड रिझर्व्ह व्याजदर वाढी संदर्भातील निर्णय जाहीर करु शकतात. यामुळे सोनं चांदीच्या दरावर दबाव येवू शकतो. सोन्याचे दर एक लाकांपर्यंत येवू शकतात याबाबत हे सर्व अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दर हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत.