SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फक्त 36 हजाराचा फरक, सोनं 1 लाखाच्या खाली येणार? डिंसेबर 2026 मध्ये सोन्याबाबतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरणार?

सोनं चांदीच्या दराचा बुडबुडा फुटला आहे. सोनं चांदीच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर 1.36 लाखांवर आला आहे. सोन्याचा दर एक लाखाच्या खाली येवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 15, 2026, 08:19 PM IST | Updated: Nov 15, 2026, 08:29 PM IST
Join

Gold Rate : सोनं चांदीच्या दराचा बबल फुटला आहे. सोनं चांदीचे दर उच्चांकी दरापेक्षा लक्षणीयरित्या घसरले आहेत. 7 महिन्यांनंतर सोन्यााचे दर 1.36 लाखा रुपयांवर आले आहेत. 3 दिवसांत सोनं 6,611 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे दर देखील उच्चांकी दरावरुन 1.77 लाखांवर आला आहे. सध्याची जागतिक आर्थिक स्थिती पाहता सोन्याचे दर सोन्याचे दर आणखी घसरु शकतात. सोन्याचा दर एक लाखावर येण्यासाठी फक्त 36 हजार रुपयांचा फरक आहे.   डिंसेबर 2026 मध्ये सोन्याबाबतची सर्वात  मोठी भविष्यवाणी खरी ठरु शकते सोन्याचा दर  1 लाखाच्या खाली येवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दाराने सर्वात उच्चांकी विक्म नोंदवला होता. एक तोळा सोन्याचा दर 1.83 लाखांपर्यंत पोहचला होता. तर चांदीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. 7 महिन्यांनंतर सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. एकूणच सोन्याच्या दरात जवळपास 50,000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. एका तोळा सोन्याचा दर 1.36 लाखाच्या खाली आला आहे. चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 2.40 लाखांची घरसण झाली आहे. चांदीचा दर 1.77 लाखांपर्यंत आला आहे.  

15 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर 1,35,809 रुपयांवर आला.  चांदीचा दर 1.81 लाख रुपयांवरून 1.78 लाख रुपयांवर आला आहे. सलग तीन दिवसांत सोन्याच्या भावात 3,611 रुपयांची तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी जास्त दराने सोन्या-चांदीची विक्री केल्याने दरात  घट झाली आहे.

सोनं चांदीचे दर का घरसत आहेत? 

सणासुदीपूर्वी सोन्याचे दर वाढले होते. यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी आपले सोने विकायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलर आणि बॉण्ड्स मजबूत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. विक्रमी दर पाहून, सामान्य खरेदीदारांनी खरेदी कमी केल्याने दर घसरले आहेत. सौर आणि इलेक्ट्रॉनिक्स कारखान्यांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जागतिक मंदीमुळे या उद्योगांकडून मागणी कमी झाली आहे. शेअर आणि वायदे बाजारातील चढउतारामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी अचानक आपली चांदी विकली, ज्यामुळे किमती झपाट्याने घसरल्या.

सोन्याचा दर एक लाखाच्या खाली येणार? 

सोन चांदीच्या दरात सुरु असलेली घरसण दीर्घकाळ चालणारी आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात सराफा बाजारात आणखी  मोठी गरसण होऊ शकते. बँक ऑफ अमेरिकाने (BofA) सोन्याचा दरात मोठी घरसण होऊ शकते असा दावा केला आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालानुसार, जानेवारी 2026 मध्ये प्रति औंस सुमारे 5,595 डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली.   घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति औंस सुमारे 3,700 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. भारतीय चलनात, ही किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.12 लाख रुपये इतकी आहे. सोन्याचा दर 3,250 डॉलरवर आल्यास भारतीय चलनानुसार एक तोळा सोन्याचा दर एक लाखाच्या खाली म्हणजेच 98,000 रुपयांपर्यत होऊ शकतो. 

गोल्ड मार्केटची सध्याची स्थिती पाहता सोन्याचा दर एक लाखाच्या खाली येवू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेची फेड रिझर्व्ह व्याजदर वाढी संदर्भातील निर्णय जाहीर करु शकतात. यामुळे सोनं चांदीच्या दरावर दबाव येवू शकतो. सोन्याचे दर एक लाकांपर्यंत येवू शकतात याबाबत हे सर्व अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दर हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत.  

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES