एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, नूडल्स खाल्ल्याने जीव गमावला?
ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा येथे एकाच परिसरातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिकदृष्ट्या, अन्नपदार्थातून झालेल्या विषबाधेमुळं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
पोलिसांना 17 ऑक्टोबर रोजी सकाळी घरातच पाच जणांचे मृतदेह सापडल्याची सूटना मिळाली. सुरुवातीला या पाचही जणांचा मृत्यू अन्नातून विषबाधेने झाल्याचा संशय आहे. मृतांची ओळख महेश, पत्नी ललिता, मुलगा लड्डू, मुलगी मिष्टी आणि तीन वर्षाचा मुलगा साक्षात अशी पटली आहे. सूचना मिळताच स्थानिक पोलिस, वरिष्ठ अधिकारी आणि फूड सेफ्टी विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाचे निरीक्षण फॉरेन्सिक टीमने केले असून पुरावे गोळा केले जात आहेत. तर, पाचही मृतदेहांचा पंचनामा करण्यात येत असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी रात्री न्यूडल्स खाल्ले होते. त्यानंतरच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं अन्नातून विषबाधा झाल्याने पाचही जणांचा मृत्य़ू झालाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आता महेशने हे न्यूडल्स कुठून मागवलेले तसंच, त्यात स्वतःहूनच काही विषारी पदार्थ मिसळले होते के? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिस महेश यांच्या शेजारी राहणाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसंच, नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सकाळी घरात कोणतीही हालचाल नसल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या शवविच्छेदन अहवालावर आणि इतर वैज्ञानिक तपासांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जात आहे. याशिवाय, इतर दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे.