पती मध्यरात्री घरी परतला तेव्हा पत्नी शेजाऱ्याच्या खोलीत आढळली, संतापाच्या भरात पतीने उचलले टोकाचे पाऊल!
पंजाबच्या लुधियानामध्ये पत्नी शेजाऱ्याच्या खोलीत आढळल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. पतीने विष प्राशन करून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. दोघांवर हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका तरुणाचा संसार पंजाबमधील लुधियाना येथे सुरू होता. पत्नी आणि दोन जुळ्या मुलींसह तो बिलगा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. ट्रॅक्टरचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीत तो काम करत होता. मंगळवारी रात्री त्याने नाईट ड्युटी असल्याचे सांगून घर सोडले. मात्र, रात्री सुमारे एक वाजता तो अचानक घरी परतला. पत्नी घरात नसल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या घनश्यामच्या खोलीत शोध घेतला. तिथे पत्नी आणि घनश्याम आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
पाच महिन्यांपूर्वी राहायला आला होता तरुण
हरदोईच्या लोनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तरुणाचे वय 20 वर्षे आहे. त्याची पत्नी आणि दीड वर्षांच्या दोन जुळ्या मुली त्याच्यासोबत राहत होत्या. सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्याच गावातील घनश्याम नावाचा तरुणही त्याच्यासोबत राहायला आला होता. त्यानंतर पत्नी आणि घनश्याम यांच्यात जवळीक असल्याचा संशय पतीला येऊ लागला. यावरून घरात वाद होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्नीने त्याला स्वतःच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर त्याने शेजारी स्वतंत्र खोली भाड्याने घेतली होती, अशी माहिती पतीने दिली.
वादाचे रूपांतर हिंसक घटनेत
पत्नीला शेजाऱ्याच्या खोलीत पाहिल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर बुधवारी सकाळी पुन्हा वाद वाढला. संतापलेल्या पतीने आधी विषारी पदार्थ प्राशन केला आणि त्यानंतर पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचे वृत्त आहे. या झटापटीत पतीच्याही गळ्याला चाकू लागून दुखापत झाली. दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पत्नीच्या गळ्यावर 20 सेंटीमीटरची जखम
प्रथम दोघांना लुधियाना येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून त्यांना हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये हलवले. महिलेच्या गळ्यावर सुमारे 20 सेंटीमीटर लांब आणि 3 सेंटीमीटर खोल जखम होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, ईएनटी सर्जन डॉ. विवेक सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. पतीच्या गळ्यावरही चार ते पाच सेंटीमीटरची जखम होती. दोघांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन चिमुकल्या मुलींच्या भविष्याचा प्रश्न
या घटनेत सर्वाधिक असुरक्षित स्थितीत दीड वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत. आई-वडील दोघेही रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झालाय.