SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

HDFC च्या खातेधारकांसाठी मोठी बातमी, 500 पर्यंतच्या UPI पेमेंटवर SMS सुविधा बंद

HDFC Bank UPI SMS News : HDFC बँकेत खातं असणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. यानुसार 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर SMS अलर्ट पाठवण बँकेकडून बंद केलं जाणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 27, 2026, 21:52 IST | Updated: Nov 27, 2026, 22:31 IST
Image Credit: HDFC च्या खातेधारकांसाठी मोठी बातमी, 500 पर्यंतच्या UPI पेमेंटवर SMS सुविधा बंद
Join

HDFC Bank UPI SMS News : आजकाल UPI पेमेंट ग्राहक खूपच सहजपणे वापरतात. अगदी 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपयांच्या व्यवहारासाठी सुद्धा UPI पेमेंटचा वापर केला जातो. UPI च्या माध्यमातून एखादं पेमेंट करताच बँकेकडून एक SMS येतो की तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे कट झाले. मात्र आता येत्या नवीन वर्षापासून HDFC Bank च्या ग्राहकांना 500 पर्यंतच्या UPI पेमेंटवर SMS अलर्ट मिळणार नाही.

HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना एक नोटिफिकेशन पाठवलं असून यात सांगण्यात आलंय की येत्या 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर SMS अलर्ट पाठवण बँकेकडून बंद केलं जाणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 100, 200 किंवा 500 रुपयांचं UPI पेमेंट करत असाल तर तुम्हाला बँकेकडून SMS येणार नाही.

RBI चा नवा नियम आहे?

RBI ने इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांबाबत हे निर्देश जाहीर केले आहेत. हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असून या नियमानुसार 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठी बँकांना त्वरित SMS अलर्ट पाठवणे आवश्यक असेल. तर 500 रुपयांपर्यंत होणाऱ्या व्यवहारांचे SMS पाठवणं हे बँकेच्या आपल्या पॉलिसी नुसार असेल. म्हणजेच बँकेला हवं असेल तर SMS पाठवू शकतात किंवा ते लहान व्यवहारांचे SMS पाठवणं बंद करू शकतात. 500 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी पाठवल्या जाणाऱ्या एसएमएस अलर्टसाठी बँका आता ग्राहकांकडून शुल्क आकारू शकत नाहीत. आरबीआयचा हा नियम केवळ यूपीआय (UPI) पुरताच मर्यादित नसून, तो सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांना लागू होतो.

हेही वाचा : 'शरद पवारांच्या NCP सह...', राहुल गांधींचं मोठं विधान; 'आम्ही जीवापाड प्रयत्न करु, पण...'

आता कसं मिळणार व्यवहाराचं अलर्ट?

HDFC बँकेच्या एका अधिसूचनेनुसार 1 जानेवारीपासून 500 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी SMS अलर्ट पाठवले जाणार नाहीत. मात्र बँकेकडून सर्व UPI व्यवहारांसाठी ईमेलद्वारे अलर्ट मिळणे सुरूच राहील. म्हणजेच SMS सूचना बंद झाल्या तरी तुम्हाला ईमेलद्वारे अलर्ट मिळत राहतील. याव्यतिरिक्त बँकेच्या धोरणानुसार बँक इतर प्रकारच्या सूचनाही पाठवू शकते, जसे की इन-ॲप नोटिफिकेशन्स किंवा पुश नोटिफिकेशन्स.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES