दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी महागाई भत्त्यात (DA) 5 टक्के वाढ जाहीर केल्याचे वृत्त आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 2.75 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे. याशिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणेच्या थकबाकीपोटी 10 हजार रुपयांचे एकरकमी पेमेंट देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. वाढीव भत्ता कधी मिळणार आणि पगारावर किती परिणाम होणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हिमाचल प्रदेश सरकारने महागाई भत्त्यात एकूण 5 टक्के वाढ जाहीर केली आहे. यामध्ये चालू वर्षातील 4 टक्के वाढ आणि मागील वर्षातील 1 टक्का बाकी असलेली वाढ समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नाला आधार मिळावा, हा अशा वाढीमागील महत्त्वाचा उद्देश असतो.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महागाई भत्त्याच्या वाढीसंदर्भातील अधिसूचना १ नोव्हेंबर रोजी जारी केली जाणार आहे. वाढीव भत्ता ऑक्टोबरच्या पगारासोबत देण्याची माहितीही या वृत्तात देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किती रक्कम मिळेल, हे त्यांच्या मूळ वेतनावर आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.
महागाई भत्ता वाढीबरोबरच हिमाचल प्रदेशातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. वेतन सुधारणेच्या थकबाकीपोटी पात्र कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचे एकरकमी पेमेंट दिले जाणार आहे. ही रक्कम १ नोव्हेंबर रोजी बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.
महागाई भत्त्याची वाढ टक्केवारीत जाहीर झाली असली, तरी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हातात येणारी अतिरिक्त रक्कम सारखी नसते. उदाहरणार्थ, एखाद्याचे संबंधित मूळ वेतन 30000 रुपये असल्यास 5 टक्के वाढीची गणना 1500 रुपये होते.
हिमाचल प्रदेश सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपोआप लागू होत नाही. प्रत्येक राज्य सरकार स्वतःचे निर्णय आणि शासन निर्णय जारी करते. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांनी राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आलाय.