SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारताच्या हवामानात पुन्हा विचित्र बदल, 13 राज्यांना IMD चा अलर्ट, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 8 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): भारताच्या हवामानत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 13 राज्यांना अलर्ट दिला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रात हवामान कसे असेल.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 08, 2026, 22:46 IST | Updated: Nov 08, 2026, 22:50 IST
Join

 8 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : मान्सूनचा हंगाम संपला असला तरी भारताचे हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. हवामान विभागाने(IMD) 13 राज्यांना अलरट दिला आहे. 9 नोव्हेंबरपासून दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये, तसेच पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर पुन्हा वाढार आहे.  काही राज्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो. अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

9 नोव्हेंबरला दक्षिण भारत, पूर्व भारत आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने (आयएमडी) 13 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी 40 ते 90 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. जम्मू - काश्मीर तसेच लडाखमध्ये हिमवृष्टी अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. 

9 ते 14 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
जम्मू आणि काश्मीर, लडाख, केरळ, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्येही 9 ते 14 नोव्हेंबर दरम्यान  पावसाची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर रोजी पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

13 राज्यांना IMD चा अलर्ट

भारतीय हवामान विभागाने 9 नोव्हेंबर रोजी 13 राज्यांना अलर्ट दिला आहे.  तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेटांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल

महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. पुणे, मुंबई नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह बहुतांश भागांमध्ये आकाश कोरडे आणि निरभ्र राहणार आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान हळूहळू कमी होत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.  धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि रात्री हलकी थंडी जाणवणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES