SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दसऱ्याला शस्त्रपूजन केल्यानंतर AK-47 मधून फायरिंग करणाऱ्या IPS अंकिता शर्मा चर्चेत; लाईफची रिअल स्टोरी जाणून थक्क व्हाल

IPS अंकिता शर्मा चर्चेत आल्या आहेत. दसऱ्याला श्त्रपूजन केल्यानंतर AK-47 मधून फायरिंग केली.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 21, 2026, 06:45 PM IST | Updated: Oct 21, 2026, 07:07 PM IST
Join

 IPS अंकिता शर्मा : दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे.  दसऱ्याला स्त्रपूजन केल्यानंतर AK-47 मधून फायरिंग करणाऱ्या IPS अंकिता शर्मा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अंकिता शर्मा निळ्या रंगाच्या साडीत हातात AK-47 घेऊन आहेत. पूजेनंतर त्यांनी AK-47 मधून गोळीबार केला आहे. सोशल मिडियावर त्या प्रचंड ट्रेंड होत आहेत. लोक त्यांचे फोटो, प्रोफाईल पाहत आहते. अनेक लोक त्यांच्याबद्दल आणखी माहिती शोधत आहेत. 

आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांचा निळ्या रंगातील साडीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांच्या हातात  AK-47 दिसत आहे.  छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शस्त्रपूजा केल्यानंतर त्यांनी या AK-47 मधून फायरिंग केली. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

कोण आहेत IPS  अंकिता शर्मा? 

अंकिता शर्मा  छत्तीसगड केडरच्या 2018 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी  आहेत. अंकिता शर्मा या 'लेडी सिंघम' म्हणूनही ओळखल्या जातात. छत्तीसगडच्या दुर्गम भागांमध्ये आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात असताना, त्यांनी गुन्हेगार आणि नक्षलवाद्यांविरुद्ध अनेक मोहिमांचे नेतृत्व केले होते. दरारा,  दबदबा आणि काम करण्याची डॅशिंग स्टाईल यानळे संपूर्ण  पोलीस दलात 'लेडी सिंघम' या टोपणनावने ओखल्या जातात.  

पाचवीत असताना अंकिता शर्मा यांना  गणिताच्या पेपरमध्ये 50 पैकी फक्त 5 गुण मिळाले होते. यानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.  दहावीत त्यांना 92 टक्के आणि बारावीत 90 टक्के गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. दोनदा अपयश आल्यानंतर  तिसऱ्या प्रयत्नात त्या अधिकारी बनल्या.  अखिल भारतीय स्तरावर 203 वा क्रमांक मिळवला आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

पहिल्या प्रयत्नात ती मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचली, पण दुसऱ्या प्रयत्नात ती प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकली नाही. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात तिने यशाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला.  पहिल्या प्रयत्नात त्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या, पण दुसऱ्या प्रयत्नात  प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश मिळवले. 

25 जून 1990 रोजी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात अंकिता शर्मा यांचा जन्म  झाला. अंकिता यांनी 2017 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 203 वा क्रमांक मिळवला. छत्तीसगडच्या गृह संवर्ग म्हणून त्यांची पोस्टिंग करण्यात आली.   त्यांनी रायपूरमधील आझाद चौक येथे सीएसपी म्हणूनही काम पाहिले. मे 2022 मध्ये, त्यांची खैरागढच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या खैरागढच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक ठरल्या. 

नक्षलग्रस्त बस्तर भागात  त्यांनी  नक्षलविरोधी मोहिमांचे यशस्वीपणे नेतृत्व केले. सध्या, अंकिता राजनांदगाव जिल्ह्याच्या पोलीस कॅप्टन आहेत. भारतात दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याची जुनी परंपरा आहे. पोलीस  आणि सुरक्षा दलांमध्येही शस्त्रांची पूजा केली जाते. अंकिता यांच्या व्हयरल व्हिडिओमुळे शस्त्रपूजेच्या परंपरेवर नव्हे, तर गोळीबार करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES