मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान हायजॅकची धमकी, टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वी..; 5 क्रू मेंबर अन् 108 प्रवाशांचा...
मुंबईला येणाऱ्या 5 क्रू मेंबर आणि 108 प्रवाशी असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटच्या आरशावर विमान हायजॅक धमकीचा मेसेज पाहून एकच थरकाप उडाला.
एअर इंडियाच्या विमानामध्ये अचानक 'हायजॅक'च्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली. कोलकाताहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामधील टॉयलेटच्या आरशावर हायजॅक हा मेसेज लिहिल्याचे आढळून आले. यावेळी विमानात 5 क्रू मेंबरसह 108 प्रवाशी होते.
विमानाचे टेक-ऑफ होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी एका कर्मचाऱ्याला विमानाच्या टॉयलेटमधील आरशावर 'विमान हायजॅक होणार' अशी धमकी लिहिलेली दिसून आली. यानंतर तातडीने सतर्कतेचा अर्लट देण्यात आला. हा अर्लट मिळताच विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. त्यानंतर त्या विमानाला स्वतंत्र आयसोलेशन बे मध्ये हलवण्यात आले. ही भयानक घटना नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद झाली आहे.
कोलकाता इथून मुंबईसाठी सकाळी 10.30 ची एअर इंडिया AI 2772 / A320 टेकऑफसाठी रेडी होती. या विमानात त्यावेळी 5 क्रू मेंबरसह 108 होते. विमानाने टेक-ऑफ घेण्यापूर्वी केबिन क्रूची नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असतानाच एका कर्मचाऱ्याचे लक्ष विमानातील वॉशरुमच्या आरशाकडे गेले. त्या आरशावर लाल रंगाच्या लिपस्टिकने 'हायजॅक'चा असं लिहिलं होतं. कर्मचाऱ्याने तात्काळ याची माहिती विमानाचे मुख्य वैमानिक आणि विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला दिली. त्याक्षणीच विमानाचे टेक ऑफ थांबवण्यात आलं. ते विमान आयसोलेशन बे मध्ये हलवलं आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं.
हायजॅकचा मेसेज मिळताच विमानतळ प्रशासनाने 'हायजॅक प्रोटोकॉल' लागू करत तातडीने आणीबाणी घोषित करण्यात आली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि बॉम्बशोधक पथकाने विमानाला घेराव घालून तपासणी करण्यात आली.
दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमान, विमानातील प्रत्येक सीट, कार्गो होल्ड आणि सर्व प्रवाशांच्या बॅगांची मेटल डिटेक्टर आणि स्निफर डॉग्सच्या सहाय्याने अत्यंत कसून तपासणी केल्यानंतर काहीही सापडले नाही.
त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा खोडसाळपणा होता की यामागे काही कट होता, याची तापसणी करण्यात येत आहे. दुसरीकडे ज्या प्रवाशांनी टेक-ऑफपूर्वी टॉयलेटचा वापर केला होता, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे नाहक हाल झाले.