• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी! लिओनिड्स उल्कावर्षावचा घेता येणार अनुभव, तारीख नोट करा

खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी! लिओनिड्स उल्कावर्षावचा घेता येणार अनुभव, तारीख नोट करा

लिओनिड उल्कावर्षाव 2026 हा परमोच्च बिंदूवर पोहोचेल, ज्यामुळे रात्रीच्या आकाशात उल्का पाहण्याची संधी खगोल प्रेमींना मिळणार आहे. भारतात उल्कावर्षाव पाहण्याची सर्वोत्तम वेळ, परमोच्च बिंदूची वेळ, लिओनिड उल्कावर्षाव कोठे आणि कोणत्या दिवशी पाहता येणार सर्व गोष्ट जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 17, 2026, 21:36 IST|Updated: Nov 17, 2026, 21:40 IST
joinshare
खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी! लिओनिड्स उल्कावर्षावचा घेता येणार अनुभव, तारीख नोट करा
Image Credit: Tempel Tuttle Comet

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. लिओनिड उल्कावर्षाव आपल्या परमोच्च बिंदूवर पोहोचल्यामुळे भारतीयांना उल्कावर्षावर पाहता येणार आहे. 17-18 नोव्हेंबरच्या रात्री पृथ्वीवरून दिसणाऱ्या सर्वात वेगवान उल्कांपैकी काही उल्का पाहणे खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. वैज्ञानिक नाव असलेले लिओनिड उल्कावर्षावात प्रति तास सुमारे 15 उल्का दिसण्याची अपेक्षा खगोलशास्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

खगोलशास्ज्ञांनी सांगितलं की, उल्का दिसण्याची प्रत्यक्षात दिसणारी संख्या ही शहरातील हवामान, ठिकाण आणि सभोवतालच्या प्रकाश प्रदूषणावर अवलंबून असणार आहे. खगोलशास्त्रापलीकडे, विविध संस्कृतींमध्ये उल्कांना प्रतीकात्मक महत्त्वही असून त्या अनेकदा इच्छा, आशा, परिवर्तन आणि नवीन सुरुवातीशी जोडल्या जातात.

धूमकेतू सूर्याभोवती फिरताना त्याचे काही अवशेष मागे राहतात. हे अवशेष पृथ्वीच्या वातावरणात आले की उल्का दिसतात. त्या एकाच तारकासमूहातून येत असल्याचा भास होतो. ‘टेंपल-टटल’ धूमकेतूच्या अवशेषांमुळे हा उल्कावर्षाव होतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्याजवळून जातो. प्रकाशरेषा म्हणजे तारा तुटणे नव्हे, तर ती खगोलीय घटना आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by दिपक जाधव हवामान अंदाज (@dipak_jadhav_32)

 

टेम्पल टटल हा धूमकेतू १९९९ साली पृथ्वीजवळून गेला होता, तेव्हा खूप मोठ्या संख्येने उल्का पहावयास मिळाल्या. पण इतक्या वर्षात धूमकेतूचा हा मलबा आता कमी झाल्यामुळे उल्का दिसण्याचे प्रमाणं कमी झाले आहे. हा उल्का वर्षाव पाहण्यासाठी मध्यरात्रीनंतर पूर्वेकडे गावाच्या बाहेर (कमीत कमी ५ कि.मी. दूर) अंधाऱ्या जागी जावे लागेल. शहरातून, घराच्या गच्चीवरून हा उल्का वर्षाव दिसणार नाही.

रस्त्यावरील दिवे आणि इमारतींपासून दूर, मोकळी जागा शोधा.
उल्कावर्षावाच्या उगमस्थानाकडे थेट पाहणे टाळा. उल्का आकाशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दिसू शकतात.
तुमच्या डोळ्यांना अंधाराशी जुळवून घेण्यासाठी सुमारे २०-३० मिनिटे वेळ द्या.
तुमचा फोन वारंवार तपासणे टाळा, कारण त्याच्या तेजस्वी स्क्रीनमुळे रात्रीच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
आकाशाचे विस्तीर्ण दृश्य पाहण्यासाठी मागे टेकून बसा किंवा आरामखुर्चीचा वापर करा.
उल्कावर्षाव पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीची गरज नसते. खरे तर, उघड्या डोळ्यांनी निरीक्षण केल्यास अधिक विस्तृत दृश्य दिसते.

ढगाळ वातावरण, वायू प्रदूषण आणि कृत्रिम प्रकाशामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, विशेषतः भारतातील मोठ्या शहरांमध्ये.

दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये पहाटेच्या वेळी हा वर्षाव पाहण्याची संधी मिळते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
News in Marathi