पाटण्यावरून लखनऊला येणाऱ्या इंडिगो एयरलाईन्सच्या विमानावर वीज कोसळली आहे, त्यामुळे विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं आहे. विमान 17 हजार फुटांवर असतानाच विमानावर वीज कोसळली, पण पायलटना विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालंय, हे समजलंच नाही. सुदैवाने या अपघातात कोणतंही नुकसान झालं नाही. पायलटनी 104 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्ससह विमान सुरक्षितरित्या लखनऊच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवलं.
इंडिगोचे 6E925 हे विमान पाटण्यावरून लखनऊला येत होतं. हे विमान लखनऊ विमानतळावर संध्याकाळी 4.12 मिनिटांनी आठ मिनिटं लवकर पोहोचलं. टेल रजिस्ट्रेशन VT-IQZ चे हे विमान एयरबस A320-251N आहे. रनवेवर प्रवाशांना उतरवल्यानंतर विमान निर्धारित ठिकाणी पार्क करण्यासाठी नेलं गेलं, तेव्हा विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं समजलं.
INDIGO FLIGHT NOSE DAMAGED AFTER LIGHTNING STRIKE AT 17,000 FEET An IndiGo flight operating from Patna to Lucknow encountered severe weather at around 17,000 feet on October 7 with reports saying the aircraft was struck by lightning. Flight 6E925, carrying 104 passengers and six crew members landed safely at Lucknow Airport. The aircraft’s nose radome was found damaged after landing. Airport Visuals | Damaged Aircraft #IndiGo #Lucknow #Patna
— contentkikamii (@contentkikamii) October 8, 2026
सुरूवातीच्या माहितीनुसार पायलटनी वीज पडल्याची माहिती एयर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला दिली होती, पण वीजेमुळे विमानाचं एवढं नुकसान होईल, असं पायलटना वाटलं नव्हतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाच्या पुढच्या भागावर असणार्या नोस रॅडमचं वीज पडल्यामुळे नुकसान झालं. हे नोज रॅडम हवामान रडारचं संरक्षण करण्यासाठी बनवलं जातं. हे स्ट्रक्चर वीज कोसळण्याचा सामना करण्यासाठी आणि विमानाला सुरक्षित ठेवण्यासाठी बसवलेलं असतं.
या अपघातानंतर विमान टेकनिकल तपासणीसाठी थांबवण्यात आलं आहे. तसंच याबाबत डीजीसीएला माहिती देण्यात आली आहे. विमानाचं पूर्णपणे निरीक्षण करून मग त्याची डागडुजी केली जाईल, तोपर्यंत विमान लखनऊमध्येच राहील. डीजीसीएकडून अनिवार्य मंजुरी मिळाल्यानंतरच विमान पुन्हा उडण्यासाठी पाठवलं जाणार आहे. या घटनेदरम्यान कोणताही यात्री, पायलट आणि क्रू मेंबर्सना दुखापत झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.