• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश, पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल

जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश, पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल

जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 17, 2026, 23:44 IST|Updated: Nov 17, 2026, 23:48 IST
joinshare
जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश, पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

'द मुस्लिम 500' : जगभरात 'द मुस्लिम 500' यादीची चांगलीच चर्चा होत आहे. या यादीत जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची नावे आहेत. यावेळी या यादीत भारतातील 22 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक नेते, बॉलीवूड अभिनेते, उद्योगपती, राजकारणी आणि शास्त्रज्ञांचा समावेश आहे. 

भारतातील मुस्लिमांमध्ये, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी अग्रस्थानी आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिमांमध्ये मदानी 18 व्या क्रमांकावर आहेत. पहिल्या TOP 50 मध्ये स्थान मिळवणारे मौलाना महमूद मदानी हे एकमेव भारतीय आहेत. 

बॉलिवूडचां किंग खान  शाहरुख खान, अभिनेता आमिर खान, तसेच शबाना आझमी आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचाही यात समावेश आहे. अधिकृत यादीत शाहरुख खानचे नाव 'नवीन' असे नमूद केले आहे, म्हणजेच यावर्षी पहिल्यांदाच त्याचा यादीत समावेश करण्यात आला आहे.  राजकारणातील असदुद्दीन ओवैसी आणि बद्रुद्दीन अजमल, व्यवसाय क्षेत्रातील अझीम प्रेमजी आणि विज्ञान क्षेत्रातील डॉ. हसिमा हसन यांचाही यात समावेश आहे. 

'द मुस्लिम 500' यादी कोण प्रसिद्ध करते?

'जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिम' असा अर्थ असलेला 'द मुस्लिम 500' हा अहवाल जॉर्डनची संस्था, 'रॉयल ​​इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटर' द्वारे प्रकाशित केला जातो. याची सुरुवात 2009 मध्ये झाली. 2027 ची आवृत्ती ही त्याची 18 वी वार्षिक आवृत्ती आहे. या वर्षीच्या अहवालात 82 देशांमधील 509 नावांचा समावेश असून, त्यात 29 नवीन नावांचा समावेश आहे. 

पहिल्या स्थानावर कोण आहे? 

जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर प्रथम स्थानवर आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान, तसेच तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासोबत त्यांनी हे अव्वल स्थान विभागून घेतले आहे .

भारतातील 22 जणांची नावे

शेख अबू बकर अहमद
मौलाना कमरुझ्झमन आझमी
शबाना आझमी
सय्यद इब्राहिमुल खलील अल-बुखारी
मीरवाइज उमर फारूक
डॉ. हसीमा हसन
मौलाना साद कांधलवी
मौलाना जुहेर उल हसन कांधलवी
आमिर खान
डॉ. आमिर खान सन 10. डॉ. हसन खान
मौलाना महमूद मदनी 13.
मौलाना सय्यद अर्शद मदनी
डॉ. बहाउद्दीन मुहम्मद जमालुद्दीन नदवी
डॉ. झाकीर अब्दुल करीम नाईक
मुफ्ती अबुल कासिम नोमानी
मौलाना शाकीर अली नूरी
असदुद्दीन ओवेसी
अजीम प्रेमउद्दीन
मौलाना बद्दीन 2.
ए.आर. रहमान
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Shah Rukh Khan