जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश, पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल
जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत भारतातील 22 जणांच्या नावांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीचे नाव जाणून शॉक व्हाल.
'द मुस्लिम 500' : जगभरात 'द मुस्लिम 500' यादीची चांगलीच चर्चा होत आहे. या यादीत जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची नावे आहेत. यावेळी या यादीत भारतातील 22 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धार्मिक नेते, बॉलीवूड अभिनेते, उद्योगपती, राजकारणी आणि शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
भारतातील मुस्लिमांमध्ये, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी अग्रस्थानी आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिमांमध्ये मदानी 18 व्या क्रमांकावर आहेत. पहिल्या TOP 50 मध्ये स्थान मिळवणारे मौलाना महमूद मदानी हे एकमेव भारतीय आहेत.
बॉलिवूडचां किंग खान शाहरुख खान, अभिनेता आमिर खान, तसेच शबाना आझमी आणि संगीतकार ए. आर. रहमान यांचाही यात समावेश आहे. अधिकृत यादीत शाहरुख खानचे नाव 'नवीन' असे नमूद केले आहे, म्हणजेच यावर्षी पहिल्यांदाच त्याचा यादीत समावेश करण्यात आला आहे. राजकारणातील असदुद्दीन ओवैसी आणि बद्रुद्दीन अजमल, व्यवसाय क्षेत्रातील अझीम प्रेमजी आणि विज्ञान क्षेत्रातील डॉ. हसिमा हसन यांचाही यात समावेश आहे.
'द मुस्लिम 500' यादी कोण प्रसिद्ध करते?
'जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिम' असा अर्थ असलेला 'द मुस्लिम 500' हा अहवाल जॉर्डनची संस्था, 'रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटर' द्वारे प्रकाशित केला जातो. याची सुरुवात 2009 मध्ये झाली. 2027 ची आवृत्ती ही त्याची 18 वी वार्षिक आवृत्ती आहे. या वर्षीच्या अहवालात 82 देशांमधील 509 नावांचा समावेश असून, त्यात 29 नवीन नावांचा समावेश आहे.
पहिल्या स्थानावर कोण आहे?
जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर प्रथम स्थानवर आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान, तसेच तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यासोबत त्यांनी हे अव्वल स्थान विभागून घेतले आहे .
भारतातील 22 जणांची नावे
शेख अबू बकर अहमद
मौलाना कमरुझ्झमन आझमी
शबाना आझमी
सय्यद इब्राहिमुल खलील अल-बुखारी
मीरवाइज उमर फारूक
डॉ. हसीमा हसन
मौलाना साद कांधलवी
मौलाना जुहेर उल हसन कांधलवी
आमिर खान
डॉ. आमिर खान सन 10. डॉ. हसन खान
मौलाना महमूद मदनी 13.
मौलाना सय्यद अर्शद मदनी
डॉ. बहाउद्दीन मुहम्मद जमालुद्दीन नदवी
डॉ. झाकीर अब्दुल करीम नाईक
मुफ्ती अबुल कासिम नोमानी
मौलाना शाकीर अली नूरी
असदुद्दीन ओवेसी
अजीम प्रेमउद्दीन
मौलाना बद्दीन 2.
ए.आर. रहमान
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन