SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

10,000 कोंटीचे नुकसान होऊ शकते; दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र, रॅली पुढे ढकलण्याची विनंती

दिल्लीतील व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहीले आहे. 1 नोव्हेंबरची इंडिया आघाडी रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा दिला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 24, 2026, 06:42 PM IST | Updated: Oct 24, 2026, 07:00 PM IST
Join

इंडिया आघाडी  रॅली :  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आता इंडिया आघाडीने 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर एका भव्य रॅलीचं आयोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, असं असतानाच दिल्लीतील व्यापाऱ्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलं असून 1 नोव्हेंबरची दिल्लीतील रॅली पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांची संस्था असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने राहुल गांधी यांना या मागणीच्या संदर्भात पत्र लिहिलं. ही रॅली दिवाळीचा सण संपल्यानंतर आयोजित करण्याची विनंती या पत्राच्या माध्यमातून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांना केली आहे. दिवाळी सणाच्या काळात व्यापाऱ्यांचं 10 हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “जर ही रॅली ठरलेल्या तारखेला झाली तर ऐन सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचं तब्बल १० हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. कारण दिवाळीच्या काळात दिल्लीत एकूण २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. गेल्या महिन्यात झालेल्या विविध आंदोलनामुळे आणि त्यानंतरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे व्यापाऱ्यांना ३ हजार कोटींचा फटका बसला आहे.”

'महारॅली'साठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी 

दिल्लीतील 1 नोव्हेंबरच्या 'महारॅली'साठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरु आहे.  प्रत्येक राज्यातून मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्त्यांना दिल्लीत येण्याच्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सूचना करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्रातून 3 हजारपेक्षा जास्त काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिल्लीत दाखल होणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील नेते 'महारॅली'त सहभागी होणार आहेत. 
इंडिया आघाडीचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.  काँग्रेसचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, प्रदेश कार्यकारिणी , AICC आणि CWC चे सदस्य यांना दिल्लीत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES