• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर, 2.9 लाख पगार घेणाऱ्याला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी कशी मिळाली?

एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर, 2.9 लाख पगार घेणाऱ्याला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी कशी मिळाली?

2.9 लाख पगार असलेली नोकरी अचानक गमावली. यानंतर खचून न जाता नव्या संधी शोधत थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी मिळाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 25, 2026, 05:03 PM IST|Updated: Oct 25, 2026, 05:10 PM IST
joinshare
एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर, 2.9 लाख पगार घेणाऱ्याला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी कशी मिळाली?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Layoff : सध्या जगभरात सर्वच कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु आहे. लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळे कधीगी नोकरीवर गदा येऊ शकते. या दहशतीत अनेक कर्मचारी आहेत. अशातच एका टेक प्रोफेशनलने आपली सक्सेस स्टोरी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. 2.9 लाख पगार घेणाऱ्याला या टेक प्रोफेशनलला थेट UAE मध्ये 1.5 कोटी पगाराची नोकरी मिळाली आहे. त्याला एकाचवेळी 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर आल्या होत्या. जाणून घेऊया त्याच्या करिअरमध्ये नेमकं काय घडलं? 

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतात. अनेकदा खूप मेहनत करूनही अपेक्षेप्रमाणे यश  मिळत नाही यामुळे अनेकजण खचून जातात.  एका टेक प्रोफेशनले आपली एक कहाणी सांगितली आहे, ज्यामुळे तरुणांना प्रोत्साहनच मिळेल. कठोर मेहनती शिवाय यश मिळत नाही असा सल्लाही त्याने दिला.

करिअरची सुरुवात केली तेव्हा माझा पगार फक्त 2.9 लाख होता. आता मला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 1.5 कोटी पगाराच्या जॉबची ऑफर आली आहे. मात्र, हा टप्पा गाठणे इतकं सहज सोप्प नव्हतं. प्रोफेशनल लाईफमध्ये नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या.    

रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे. आपल्या करिअरची सुरुवात एल अँड टी इन्फोटेकमध्ये मॅन्युअल टेस्टिंग असिस्टंट म्हणून केली. कंपनीच्या आवश्यक अंतर्गत परीक्षांमध्ये उत्तीर्ण न झाल्यामुळे नोकरी गमवावी लागली. तेव्हा वार्षिक पगार फक्त 2.9 लाख रुपये होता. मात्र, मी हार मानली नाही. एका मित्राच्या सल्ल्यानुसार मी आयबीएममध्ये पुन्हा अर्ज केला. 15 दिवसांत त्याला नोकरी मिळाली. मात्र, तिथेही माला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी लगेच मिळाली नाही असे या टेक प्रोफेशनलने सांगितले.

आयबीएममध्ये मला जेडी एडवर्ड्सशी संबंधित काम देण्यात आले होते. पण मला बिग डेटामध्ये काम करायची आवड होती. यामुळे स्वतःहून हे काम शिकायला सुरुवात केली.  पण अनुभव नसल्यामुळे  हव्या असलेल्या प्रोजेक्टवर पद मिळवता आले नाही. मात्र, मी हार मानली नाही.  खूप प्रयत्नांनंतर, मे 2020 मध्ये त्याला एका बिग डेटा प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली.

from getting laid off at 2.9 LPA to ₹1.5 crore package per year crazy journey 🫡 https://t.co/xtDlxozVji

— Asmit (@coolcoder56) October 23, 2026

 नवीन जबाबदाऱ्या शिकण्यासाठी आणि काम समजून घेण्यासाठी त्याला अनेकदा दिवसातून 14 ते 15 तास काम करावे लागत असे. असे असूनही, जानेवारी 2022 पर्यंत माझा वार्षिक पगार फक्त सुमारे 3.78 लाख रुपये होता. एवढी मेहनत करूनही पगारात लक्षणीय वाढ झाली नाही. यामुळे मी नवीन करिअर आणि जादा पगाराची नोकरी शोधण्यास सुरुवात केली.  विविध कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळाल्या आणि अखेरीस त्याचा पगार वाढला. एकामागून एक विविध कंपन्यांमध्ये नोकरी बदलत पगार वाढला असे त्याने सांगितले.

एअरबसमध्ये नोकरी मिळाली. येथे वर्षाला 23 लाखाचे पॅकेज मिळाले. यात 5 लाख रुपयांच्या जॉइनिंग बोनसचा समावेश होता. तिथे त्याने पॅलंटिर फाऊंड्रीसोबत काम केले. अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. प्रोजेक्टमध्ये योगदान देऊनही त्याला अपेक्षित असलेली ओळख मिळाली नाही. कामाचे कौतुक झाले नाही अशी खंत त्याने व्यक्त केली. 

यानंतर मी पुन्हा नव्या नोकरीचा शोध सुरु केला. 15 कंपन्यांकडून जॉब ऑफर्स मिळाल्या. थॉटवर्क्समध्ये वार्षिक 48 लाख रुपये पगार असलेली जॉब ऑफर स्विकारली. अवघ्या दोन महिन्यांनंतर, त्याला दुसऱ्या संस्थेकडून वार्षिक 62 लाख रुपये पगाराची आणि 500, 000 रुपयांच्या जॉइनिंग बोनसची ऑफर मिळाली. या कंपनीत वर्क फ्रॉम होम सुविधा होती. 

युएईमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या पगाराचा जॉब 

जवळपास साडे नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवल्यानंतर युएईमधील एका कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली आहे. येथे वर्षाला 1.5 कोटी पगाराचे पॅकेज मिळाले आहे.  हा माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय नोकरीचा पहिलाच अनुभव  आहे. या नऊ वर्षात नव्या नोकऱ्या शोधताना खूप नवीन काही शिकायला मिळाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india