SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘माझ्या उपचारांवर सर्व पैसे खर्च, मुलींचं भविष्य काय?’; रेल्वेच्या धडकेत आईसह 3 मुलींचे संपले जीवन; 12 वर्षाची मुलगी बचावली!

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे 39 वर्षीय महिला आणि तिच्या तीन मुलींचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. उपचारांचा खर्च आणि मुलींच्या भविष्याची चिंता असल्याचे पतीचे म्हणणे असून पुढील तपास सुरू आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 14, 2026, 03:44 PM IST | Updated: Nov 14, 2026, 03:53 PM IST
Image Credit: आईसह तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू
Join

भविष्यातील चिंता करुन अनेकजण स्वत:ला त्रास करुन घेतात. आर्थिक विवंचनेमुळे भविष्यात आपलं काय होणार? या भीतीने आपलं आयुष्य संपवून घेण्याच्या घटना घडत असतात. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील गांधी नगर परिसरात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. रेल्वेच्या धडकेत 39 वर्षीय महिला आणि तिच्या तीन मुलींचा मृत्यू झाला. किरण देवी पाल असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या कनिष्का, अनुष्का आणि काव्या या मुलींचाही मृतांमध्ये समावेश आहे. सात वर्षांच्या जुळ्या बहिणी कनिष्का आणि अनुष्का, तर काव्या पाच वर्षांची होती. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

पती मोठ्या मुलीसोबत बाजारात

किरण यांचे पती रामतेज पाल हे वन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. घटनेच्या दिवशी ते पत्नीला डोळ्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर ते आपली 12 वर्षांची मोठी मुलगी रियाला घेऊन हिवाळ्याचे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. त्याचवेळी किरण आपल्या तीन लहान मुलींसह घराबाहेर पडल्या. काही वेळाने रेल्वे रुळाजवळ चौघींचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू झाल्याचे रामतेज यांना समजले.

‘माझ्या उपचारांवर पैसे खर्च होतात, मुलींचं काय?’

किरण यांची प्रकृती बऱ्याच काळापासून ठीक नव्हती. त्यांच्यावर गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली होती. डोळ्यांवरही उपचार सुरू होते. सततच्या उपचारांमुळे कुटुंबाचा खर्च वाढत होता. या खर्चामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पैसे कसे उरणार, अशी चिंता किरण व्यक्त करायच्या, असे  पतीने सांगितले. मुली मोठ्या झाल्यावर स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असे मी तिला समजावून सांगायचो असेही त्यांनी सांगितले.

आत्महत्येचा संशय

प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र, किरण या मुलींना घेऊन रेल्वे रुळांपर्यंत कशा पोहोचल्या? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. स्थानिक पोलीस आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) संयुक्तपणे तपास करत आहेत. पतीने सांगितलेल्या कौटुंबिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीचीही चौकशी केली जात आहे.

मोठी मुलगी बचावली

घटनेच्या वेळी 12 वर्षांची रिया वडिलांसोबत बाजारात असल्याने ती बचावली. असे असले तरी एका क्षणात तिने आई आणि तीन बहिणींना गमावले. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करून प्रशासनाला पीडित कुटुंबाला आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES