SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नोव्हेंबर सुरू, मात्र अद्यापही थंडीचा पत्ताच नाही, कधी येणार हिवाळा? वाचा या महिन्याचा हवामानाचा अंदाज

नोव्हेंबर सुरू झाला आहे. मात्र अजूनही थंडीची चाहूल लागली नाही. नोव्हेंबरमध्ये थंडी कधी सुरू होणार, जाणून घेऊयात.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 01, 2026, 01:45 PM IST | Updated: Nov 01, 2026, 01:46 PM IST
Image Credit: maharashtra weather update
Join

उन्हाळा, पावसाळा आणि आता हिवाळा उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. काहीच दिवसांत दिवाळी सुरू होईल. पण दिवाळीला अगदी काही दिवस बाकी आहेत. मात्र अजूनही थंडीची चाहुल काही लागली नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं देशातील काही भागात पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, भारतीय हवामान विभागाने थंडीबाबतही अंदाज वर्तवला आहे.

शनिवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी नोव्हेंबर महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे.  नोव्हेंबर महिन्यात मध्य आणि पूर्व भारताचा भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह लगतच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यात थंडी तुलनेने कमी राहण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहणार असले तरी मराठवाड्यात सरासरी किमान तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. तर देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीर आणि मध्य भारताचा भाग, तसेच पूर्वोत्तर राज्ये वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती नोव्हेंबर महिन्यात अतितीव्र होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा खूप कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि लगतच्या राज्यात सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची शक्यता आहे.

मुंबईत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला उकाडा कायम राहणार आहे. समुद्राच्या प्रभावामुळं शहरातील किमान तापमानातही लगेच मोठी घट होत नाही. त्यामुळं दिवाळीनंतर लगेच गुलाबी थंडीचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हिवाळ्यासारखा गारवा जाणवण्यासाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळं मुंबईकरांना खऱ्या अर्थाने थंडीचा अनुभव डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES