• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /फास्टटॅगच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट! घर बसल्या बसल्या अकाऊंटवरुन पैसे कट; लाखो लोकांसोबत घडला हा प्रकार, खरं कारण समोर

फास्टटॅगच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट! घर बसल्या बसल्या अकाऊंटवरुन पैसे कट; लाखो लोकांसोबत घडला हा प्रकार, खरं कारण समोर

वेगाने टोल वसुली करता यावी या हेतूने फास्टटॅग यंत्रणा सुरु करण्यात आली या यंत्रेणेच्या माध्यमातून टोल प्लाझा ओलांडण्याचा सरासरी वेळ आधीच्या 12.2 मिनिटांवरून सुमारे 40 सेकंदांवर आला असला तरी याचा मोठा आर्थिक फटकाही वाहनचालकांना बसलाय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 05, 2026, 09:38 AM IST|Updated: Oct 05, 2026, 09:57 AM IST
joinshare
फास्टटॅगच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट! घर बसल्या बसल्या अकाऊंटवरुन पैसे कट; लाखो लोकांसोबत घडला हा प्रकार, खरं कारण समोर
Image Credit: एक दोन नाही लाखो लोकांना आला हा अनुभव (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

फास्टटॅगच्या माध्यमातून टोलनाक्यांवर थांबण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा हेतू होता. मात्र आता याच फास्टटॅगच्या माध्यमातून लाखो रुपयांचा टोल सर्वसामान्यांच्या खिशातून चुकीच्या पद्धतीने वसूल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. डिजीटल माध्यमातून आपोआप टोल कट होणाऱ्या फास्टटॅगमधून वाहनचालकांच्या खात्यांमधून चुकीच्या पद्धतीने टोलचं शुल्क वसूल करण्यात आलं आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळात देशातील 17 लाखांहून अधिक व्यवहारांमध्ये चुकीच्या प्रमाणात यूझर फी आकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे डिजिटल टोल वसुलीतील अचूकतेचा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अर्थात ज्या वाहनचालकांनी तक्रारी नोंदवली त्यांना पैसे परत करण्यात आले असले तरी ज्यांनी अशी तक्रार नोंदवलीच नाही त्यांच्या भूर्दंड पडल्याचं सांगितलं जातंय. 

थक्क करणारे आकडे

मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये देशभरातील महामार्गावर फास्टटॅगच्या माध्यमातून तब्बल 646 कोटी व्यवहार झाले. त्यापैकी 17 लाख 66 हजार व्यवहारांमध्ये चुकीची शुल्ककपात झाली. एकूण व्यवहारांच्या तुलनेत है प्रमाण 0.03 टक्के असले, तरी प्रत्यक्षात लाखो वेळा वाहनचालकांच्या खात्यांतून चुकीच्या पद्धतीने पैसे वजा झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

तक्रार नोंदविणे आवश्यक
 

डिजिटल टोल व्यवस्थेत चुकीची कपात झाल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर वजा झालेली रक्कम संबंधित बँकेकडून वापरकर्त्याच्या खात्यात परत केली जाते. परंतु, त्यासाठी वाहनचालकांनी जागरूक राहून तक्रार नोंदविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तक्रार नोंदवणाऱ्यांना चुकीच्या पद्धथीने टोल कट झाल्यानंतर परतावा मिळाला असला तरी तक्रार न केलेल्यांचे पैसे बुडालेत. 

चुकीची वसुली झालीच कशी?
 

सर्व महत्त्वाच्या ईटीसी उपकरणांच्या स्थितीवर 'टीएमसीसी' (टोल मॉनिटरिंग अँड कंट्रोल सेंटर) मार्फत  लक्ष ठेवले जाते. सिस्टिम इंटिग्रेटर्स, बँका आणि यूजर शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांमध्ये नियमित समन्वयावर भर दिला जातो. मात्र, तरीदेखील चुकीची वसुली झालीच कशी, असा सवाल वाहनमालकांकडून उपस्थित होत आहे. 
 

पैसे कसे कट झाले?

या प्रकरणांपैकी जवळपास 35 टक्के प्रकरणांत संबंधित वाहन त्या वेळी टोल प्लाझावरच नव्हते, तरीही फास्टटॅग वॉलेटमधून पैसे कापले गेले. यामागील मुख्य कारण टोल ऑपरेटरकडून वाहन क्रमांकाची मॅन्युअल एंट्री आहे. स्कॅनर किंवा सिस्टीम बंद पडल्यावर कर्मचारी नंबर हाताने टाकतात, त्यात चुकीचा नंबर गेल्यास दुसऱ्याच्या खात्यातून टोल कापला जातो. अशा त्रुटी कमी करण्यासाठी मॅन्युअल वाहन नंबर एंट्री पूर्ण बंद करण्याचा विचार रस्ते वाहतूक मंत्रालय करत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Toll Updates
Nitin Gadkari