SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोव्यातील अर्धचंद्राकृती आकाराचा सर्वात सुंदर बीच; जगातील सर्वोत्तम 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये 6 वे स्थान पटकावले

Goa Palolem Beach  Global Beach Index 2026 : गोवा हे फक्त भारतच नाही तर जगभरातील पर्यटकांचे ड्रीन डेस्टिनेशन आहे. येथील स्वच्छ, सुंदर अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात.  गोव्यातील पाळोळे समुद्रकिनारा आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा ठरला आहे. या समुद्र किनाऱ्याने जागतिक निर्देशांकात सहावे स्थान पटकावले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 09, 2026, 22:15 IST | Updated: Nov 09, 2026, 22:20 IST
Join

Goa Palolem Beach  Global Beach Index 2026 : गोवा हे फक्त भारतच नाही तर जगभरातील पर्यटकांचे ड्रीन डेस्टिनेशन आहे. येथील स्वच्छ, सुंदर अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात.  गोव्यातील पाळोळे समुद्रकिनारा आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा ठरला आहे. या समुद्र किनाऱ्याने जागतिक निर्देशांकात सहावे स्थान पटकावले आहे.

दक्षिण गोव्यातील निसर्गरम्य पाळोळे समुद्रकिनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून बहुमान मिळाला आहे. ''बीच डॉट कॉम''च्या 2026 च्या जागतिक निर्देशांकात जगातील सर्वोत्तम 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पाळोळेने 6 वे स्थान पटकावले आहे. या यादीत स्थान मिळवणारा हा आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. 18 प्रमाणित निकषांच्या आधारे झालेल्या या निवडीमुळे गोव्याच्या पर्यटन वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पाळोळे बीच हा कानाकोण तालुक्यात आहे. अर्धचंद्राकृती खाडी, पांढरी वाळू, नारळाची झाडे आणि स्वच्छ पाण्यासाठी हा समुद्र किनारा ओळखला जातो. हा समुद्र किनारा गर्दीपासून अलिप्त आहे. 
'बीच.कॉम'च्या 'ग्लोबल बीच इंडेक्स 2026' मध्ये या समुद्र किनाऱ्याने सहावे स्थान पटकावले. तज्ज्ञांच्या शिफारसी, पर्यटकांचे अभिप्राय, समुद्राच्या पाण्याचा रंग आणि स्वच्छतेबाबत अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'कडून मिळालेली माहिती यांसारख्या 18 निर्धारित मापदंडांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. 

पाळोळे समुद्रकिनाऱ्याला जगातील सर्वात समुद्र किनाऱ्यांच्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. यामुळे  आंतरराष्ट्रीय पर्यटनात गोव्याचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.  दक्षिण गोव्याला जागाच्या नकाशावर विशेष नाव मिळाले आहे. या समुद्र किनाऱ्यावर कयाकिंग, डॉल्फिन सफारी यासह अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्यने येथे येतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES