SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कधी कमी होणार पेट्रोल डिझेलच्या किंमती? पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, वाचा आजचे ताजे इंधन दर

LPG Gas Cylinder Rates : मागील काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट झालेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतींवर देशातील इंधन दर अवलंबून असतात. तेव्हा आगामी काळात ट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? तसेच आजच्या पेट्रोल डिझेलच्या ताज्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 16, 2026, 10:14 AM IST | Updated: Nov 16, 2026, 10:45 AM IST
Image Credit: आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
Join

Petrol And Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रभाव टाकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती या 96 डॉलर प्रति बॅरल इतक्या आहेत. मागच्या आठवड्यात 8 नोव्हेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये एकाच दिवशी जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली होती. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर या कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणाऱ्या चढ उताराचा परिणाम होऊ देण्यात आलेला नाही. पूर्वीच्याच किंमतीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे.

कधी कमी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती?

ANI च्या रिपोर्टनुसार पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस राज्य मंत्री सुरेश गोपीने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये लगेचच कोणतेही बदल होणार नाहीत अशी शक्यता वर्तवली आहे. चेन्नईच्या मीनाम्बक्कम विमानतळावर पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि पेट्रोलियम पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे तेल कंपन्यांचे 42,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इंधनाचे दर कमी करण्यापूर्वी, तेल कंपन्यांना त्यांना झालेल्या नुकसानीचा हिशोब द्यावा लागेल. त्यांनी सांगितले, 'आम्हाला नक्कीच असे वाटेल की दर लवकरात लवकर, अगदी पुढच्याच दिवशी कमी व्हावेत, परंतु तांत्रिकदृष्ट्या विचार करता, सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही'.

हेही वाचा : सोमवार 16 नोव्हेंबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती? पाहा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे रेट्स

तुमच्या शहरातील 16 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या किंमती :

दिल्ली - 102.12 रुपये

कोलकाता - 113.51 रुपये

मुंबई - 111.21 रुपये

तिरुअनंतपुरम् - 115.49 रुपये

हैदराबाद - 116.51 रुपये

जयपुर - 110 रुपये

चंडीगढ़ - 101.54 रुपये

गुरुग्राम - 102.97 रुपये

बंगळुरू - 111.68 रुपये

चेन्नई - 107.76 रुपये

लखनऊ - 101.86 रुपये

नोएडा - 101.96 रुपये

तुमच्या शहरातील 16 नोव्हेंबर रोजी डिझेलच्या किंमती :

दिल्ली - 95.20 रुपये

कोलकाता - 99.82 रुपये

चेन्नई - 99.55 रुपये

मुंबई - 97.83 रुपये

लखनऊ - 95.36 रुपये

हैदराबाद - 104.23 रुपये

जयपुर - 98.25 रुपये

बंगळुरू - 99.56 रुपये

गुरुग्राम - 95.64 रुपये

चंडीगढ़ - 89.47 रुपये

पटना - 113.37 रुपये

नोएडा - 95.44 रुपये

पटना - 113.37 रुपये

तिरुअनंतपुरम् - 104.40 रुपये

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES