SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाचीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; 'या' राज्यात BJP सरकार आल्यापासूनची चौथी घटना

भाचीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 09, 2026, 21:36 IST | Updated: Nov 09, 2026, 21:39 IST
Join

 पश्चिम बंगाल क्राईम : भाचीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे.  पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात ही अत्याचाराची घटना घडली होती. सोमवारी पहाटे पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या घरावर धडा टाकली. यावेळी आरोपीने अचानक गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपीचा खात्मा केला.  BJP सरकार आल्यापासूनची ही चौथी घटना आहे. 

दिलीप रॉय असे आरोपीचे नाव आहे.  कुलिक नदीजवळील जंगलात एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा नग्न आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीचा शोध सुरु केला. 

रायगंजच्या गौरी ग्रामपंचायत परिसरात पोलिसांनी आरोपीचा एन्काउंटर केला.  "मूळचा झारखंडचा रहिवासी असलेला दिलीप रॉय, रायगंजच्या परापुकुर भागातून बिहारची सीमा ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांच्या एका पथकाने सोमवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास परिसराला वेढा घातला. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच आरोपीने पोलीस पथकावर गोळीबार केला. एक गोळी तर पोलिसांच्या वाहनाच्या टायरलाही लागली.

आरोपीने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी देखील गोळीबार केला. या गोळीबारात आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रायगंज मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बहिणीच्या मुलीवर अत्याचार 

आरोपी दिलीप रॉय या मृत मुलीचा मामा आहे. 3 नोव्हेंबर 2026 रोजी ही घटना घडली.  मुलगी दुपारी सायकलवरून घरातून बाहेर पडली आणि बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिचा मामा, दिलीप रॉय, तिला कुलिक नदीकिनारी फिरायला घेऊन गेला. आरोपीने  जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी अब्दुलघाटाजवळ कुलिक नदीच्या काठावरील जंगलात या मुलीचा मृतदहे नग्न आणि अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. 

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून चौथा  एन्काउंटर

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यापासून चौथा  एन्काउंटर आहे.  जुलै 2026 मध्ये  बारुईपूर (दक्षिण २४ परगणा) येथे एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाली. आरोपी प्रभास मंडल याला घटनेच्या पुनर्निर्मितीदरम्यान पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आला.

27 ऑक्टोबर 2026 रोजी गायघाटा (उत्तर २४ परगणा) येथे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याच्या हत्या झाली.  आरोपी प्रल्हाद दास आणि मुर्शिदाबादच्या समशेरगंज येथे भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचा आरोपी सामूल हक हे वेगवेगळ्या चकमकींमध्ये ठार झाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES