24 आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात वेगळा गट; भारतातील आणखी एका राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप?
जम्मू काश्मिरमध्ये नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. 24 आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांविरोधात वेगळा गट स्थापन केला आहे.
जम्मू काश्मिर : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्री मंडळ विस्तारनंतर त्यांना मोठा झटका बसण्याचीा शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आमदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षाच्या 24 आमदांनी एल्गार पुकारला आहे. 24 आमदारांनी वेगळ गट तयार केला आहे. सर्वा आमदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकत्र आले आहेत.
श्रीनगरमध्ये लोलाबचे आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक झाली. यावेळी 18 आमदार प्रत्यक्षात बैठकीला हजर होते. तर, 6 आमदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सामील झाले होते. या बैठकीत आमदारांनी पुढच्या रणनिती विष्यी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
24 आमदारांनी वेगळ गट स्थापन करण्याचा निर्णय का घेतला?
आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर सोगामी तसेच 27 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्त केलेल्या चार नवीन मंत्र्यांना हटवण्याची मागणी केली आहे. सोगामी यांनी पक्षाच्या नेतृत्वाची दिशाभूल केली आहे. संघटनात्मक कामकाजात देखील ते हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला. मोठ्या मंत्रिमंडळ बदलांची मागणी देखील करण्यात आली.
24 आमदारांची पुढची रणनिती काय असेल?
आमदारांचे चार सदस्यीय प्रतिनिधी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदारांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुरेझचे आमदार नझीर अहमद गुरेझी तसेच थानमंडीचे आमदार मुझफ्फर इक्बाल खान यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे प्रतिनिधी मंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेणार आहे. नेतृत्वाच्या प्रतिसादाची वाट पाहून त्यानंतर पुढील कृती ठरवण्याचे निर्णय आमदारांनी घेतला आहे.
आमदार पक्ष सोडणार नाहीत
या बैठकीला हजर असलेल्या आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्सप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. पक्ष न सोडण्याची शपथ आमदारांनी घेतली. मात्र, त्यांनी काही व्यक्तींवर पक्षाच्या अंतर्गत कामकाजाला सुरुंग लावल्याचा आरोप केला. दुसरीकडे, गुरेझचे आमदार नझीर अहमद गुरेझी यांनी ही एक बैठक असल्याचे पत्रकारांना सांगितले.
मंत्रीपज न मिळाल्याने आमदार नाराज
27 ऑक्टोबर 2026 रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला. नॅशनल कॉन्फरन्सचे 4 आमदार अली मोहम्मद सागर, मीर सैफुल्ला, शमिमा फिरदौस आणि अल्ताफ अहमद कल्लू यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. अपक्ष आमदार सतीश शर्मा यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले अशी मागणी केली जात आहे. मंत्रीपदांसाठी ज्यांच्या नावांची चर्चा झाली होती, अशा अनेक ज्येष्ठ आमदारांना या विस्तारात मंत्रीपद मिळालेले नाही. यामध्ये नझीर अहमद गुरेझी आणि मुबारक गुल यांचा समावेश होता. नंतर फारुख अब्दुल्ला यांनी अली मोहम्मद सागर यांच्या जागी मुबारक गुल यांची पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्ती केली. मंत्री मंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने आमदार नाराज आहेत.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला विवाह बंधनात अडकले
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राझदान यांच्याशी विवाह केला. ओमर यांनी फोटो पोस्ट केले आणि त्यांना 'काल एका नव्या पर्वाची सुरुवात, निधी' असे कॅप्शन दिले. त्यांनी पोस्टसोबत अंगठीचा इमोजीही जोडला. निधी यांनीही एका सोशल मीडिया पोस्टमध्ये 'इट्स डन ब्रो', असं लिहिले आहे. ओमर यांनी यावर्षी 31 जुलै रोजी त्यांची पहिली पत्नी पायल यांना घटस्फोट दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी पायल यांना घटस्फोट मंजूर केला होता. त्यांचे लग्न 32 वर्षांपूर्वी झाले होते आणि ते 2011 पासून वेगळे राहत होते.