SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

12 वी पास आणि पदवीधरांसाठी रेल्वेत 5 हजार 236 पदांची मेगाभरती

Railway Job Vacancy 2026 : रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी 5 हजार 236 पदांची मेगाभरती निघाली आहे. 12 वी पास आणि पदवी असलेल्या तरुणांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 18, 2026, 12:41 PM IST | Updated: Oct 18, 2026, 01:13 PM IST
Image Credit: 12 वी पास आणि पदवीधरांसाठी रेल्वेत 5 हजार 236 पदांची मेगाभरती
Join

Railway Job Vacancy 2026 : रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. तेव्हा अशा सर्व इच्छुक उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी 5 हजार 236 पदांची मेगाभरती निघाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अखेरीस 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत 12 वी पास आणि पदवी असलेल्या तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे.

कोणत्या पदांसाठी रेल्वेत मेगाभरती?

रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी 5 हजार 236 पदांची मेगाभरती असून यात रेल्वेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनिअर क्लार्क कम टाइपिस्ट, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सीनियर लिपिक कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिक, ट्रेन्स क्लर्क लिपिक अशा पदांसाठी ही भरती केली जात आहे.

अर्ज करण्यासाठी काय आवश्यक?

या रेल्वेच्या मेगा भरतीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवे. तसेच या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असणार असून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी 500 रुपये तर एससी, एसटी, महिलांसाठी 250 रुपये फी आकारली जाणार आहे. या सर्व पदांसाठी बारावी पास आणि पदवीधर, तसेच संगणकावर इंग्रजी आणि हिंदीमध्ये टायपिंग येणे आवश्यक आहे. तेव्हा यासाठी इच्छुक उमेदवारांना भरतीसंबंधी माहितीसाठी www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.  
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES